
Stories shaping public discourse
New reports and voices from the ground
Video stories and visual journalism

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
Visual stories capturing voices from the ground

A catastrophic failure of civic infrastructure in Bhagirathpura has left at least 10 dead and thousands ill. Despite years of warnings and dozens of formal complaints about "acid-like" drinking water, administrative delays allowed a preventable sewage leak to turn into a deadly epidemic.

31 Hills Vanished: The Visual Evidence Excerpt: Official records confirm the unthinkable: 31 out of 128 hills in the Aravalli range have physically vanished due to illegal mining. With groundwater levels sinking and the new "100-meter" rule leaving the foothills vulnerable, the ecological collapse is no longer a prediction—it is happening. Explore the timeline of destruction and the movement demanding justice.




The Conversations capturing public attention

The Patna High Court's recent verdict has triggered widespread debate over the legal definition of "attempt to rape" in India. While the High Court held that certain acts did not amount to an attempt to rape in the case before it, the Supreme Court has previously adopted a broader interpretation in similar matters. This explainer examines the legal distinction between preparation and attempt, relevant provisions of Indian criminal law, and key judicial precedents that shape how courts assess such cases.

As India moves towards its Net Zero 2070 target, hydrogen-powered trains are emerging as a key innovation for sustainable rail transport. Powered by hydrogen fuel cells, these trains produce only water vapour, significantly reducing carbon emissions and noise pollution. While challenges such as infrastructure, cost, and green hydrogen production remain, the technology promises cleaner mobility, energy security, and a new era for Indian Railways and India's green economy.

आषाढी वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो विठ्ठलाचा नामघोष, टाळ-मृदुंगाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास. मात्र या भक्तीच्या सोहळ्यामागे काही हात असे असतात, जे शांतपणे वारीची व्यवस्था उभी ठेवतात. पहाटे अंधार असतानाच चुली पेटवणारे, शेकडो वारकऱ्यांसाठी जेवण बनवणारे, पाणी भरणारे, भांडी घासणारे आणि मुक्कामाची व्यवस्था सांभाळणारे हे हात बहुतांश वेळा महिलांचे असतात. त्या स्वतःही वारकरी आहेत; पण त्याचबरोबर वारीच्या व्यवस्थेचा अदृश्य आधार आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या या माऊल्या अनेकदा स्वतःचा थकवा, विश्रांती आणि वेळ बाजूला ठेवून इतर वारकऱ्यांच्या सेवेत रममाण होतात. त्यांच्या श्रमांवर उभी असलेली वारी, सेवाभाव आणि न बोलल्या गेलेल्या कष्टांची ही कहाणी...

क्रिकेटच्या इतिहासात 'सर्वश्रेष्ठ अष्टपैलू' हा शब्द ज्या एका नावाशी कायमचा जोडला गेला, त्या सर गारफिल्ड 'गॅरी' सोबर्स यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या चारही आघाड्यांवर त्यांनी उभारलेलं साम्राज्य आजही अजिंक्य मानलं जातं. २८ जुलै २०२६ रोजी ९० वर्षांचे होणारे सोबर्स वाढदिवसाच्या अवघ्या अकरा दिवस आधी काळाच्या पडद्याआड गेले आणि क्रिकेटविश्वाने आपल्या सर्वात तेजस्वी युगपुरुषाला गमावलं. सोबर्स यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचं आणि अफाट क्रिकेटवैभवाचं शब्दचित्र दिवंगत ज्येष्ठ क्रीडालेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी त्यांच्या 'चॅम्पियन्स' या पुस्तकात विलक्षण ओघवत्या शैलीत रेखाटलं आहे. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हा लेख म्हणजे एका दंतकथेचं जिवंत दर्शनच. 'बाईमाणूस'च्या वाचकांसाठी हा लेख साभार पुनर्प्रकाशित करत आहोत.

चांद्रयान-३च्या यशाने जगभरात भारताच्या अंतराळ संशोधनाची पताका फडकली. गगनयान, चांद्रयान-४ आणि भारतीय अंतराळ स्थानकाच्या स्वप्नांकडे देश आशेने पाहत असतानाच इस्रोसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. गेल्या दहा महिन्यांत शंभरहून अधिक वरिष्ठ शास्त्रज्ञांनी संस्थेला रामराम ठोकला आहे. हा केवळ राजीनाम्यांचा आकडा नाही; तर वैज्ञानिकांवरील वाढता कामाचा ताण, प्रशासकीय हस्तक्षेप, वेतनातील तफावत आणि खाजगी अवकाश क्षेत्राच्या वाढत्या आकर्षणामुळे उभे राहिलेले 'ब्रेन ड्रेन'चे वास्तव आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांच्या उंबरठ्यावर इस्रोसमोर उभे राहिलेले हे संकट केवळ एका संस्थेचे नसून भारताच्या वैज्ञानिक भवितव्याशी जोडलेले आहे.

कागदावरची 'जल जीवन' योजना प्रत्यक्षात 'जल शून्य' ठरली असून, नियोजनाचा अभाव आणि खर्चातील वाढीने या योजनेचे पितळ उघडे पाडले आहे. सरकारी आकडेवारी ८५% कामाचा दावा करते, पण जमिनीवर पाणी शोधूनही सापडत नाहीये. मग हजारो कोटी रुपयांचा हा पैसा नक्की कोणाच्या खिशात गेला?

Five women from Rajasthan have written to President Droupadi Murmu seeking urgent kidney transplants after allegedly suffering kidney failure following cesarean deliveries at a government hospital in Kota. Their emotional plea—"Give us kidneys or grant us euthanasia"—has sparked nationwide debate over maternal healthcare, medical accountability, dialysis, organ transplantation, and the responsibilities of the public health system. The case also highlights the urgent need for better patient care, transparent investigations,

न्यायालय हे न्याय, समानता आणि घटनात्मक मूल्यांचे प्रतीक मानले जाते. मात्र देशातील अनेक जिल्हा न्यायालयांमध्ये महिला वकिलांसाठी स्वतंत्र आणि वापरण्यायोग्य स्वच्छतागृहेही उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न केवळ पायाभूत सुविधांचा नसून मानवी हक्कांचा असल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारांना कठोर शब्दांत फटकारले आहे. न्यायालयीन व्यवस्थेतील या दुर्लक्षित वास्तवाची आकडेवारी अधिकच अस्वस्थ करणारी आहे.

स्वराज्याच्या इतिहासात तलवारीपेक्षाही मोठा पराक्रम करणाऱ्या वीर शिवा काशीद यांनी स्वतःचा मृत्यू निश्चित असतानाही एका दिवसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण केला. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि स्वराज्याचा इतिहास नव्या वळणावर गेला.

Every year, lakhs of devotees participate in the Ashadhi Wari, but behind the devotional journey are sanitation workers who keep the pilgrimage clean. This ground report tells the story of Badrilal Mehtar's family from Madhya Pradesh, whose unseen labour ensures a safe and hygienic Wari for millions.