शिवमंदिर सांभाळणारे ‘हाजी मतीबर रहमान’

500 वर्ष जुने महादेवाच्या मंदिराची देखभाल करत आहे मुसलमान कुटुंब.

टीम बाईमाणूस

काही लोक धार्मिक मतभेदांच्या नावाखाली द्वेष पसरवण्यात कसलीही कसूर करत नसतांना, हे मुस्लिम कुटुंब मात्र अतिशय शांतपणे जगाला सद्भाव आणि प्रेमाचा धडा शिकवत आहे. पिढ्यानपिढ्या या कुटुंबातील सदस्य गुवाहाटी येथील रंगमहाल गावात असलेल्या ५०० वर्ष जुन्या शिवमंदिराची देखभाल करत आहेत.

या भागातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोक येथे असणाऱ्या भगवान शिवावर दृढ विश्वास ठेवतात आणि येथे प्रार्थना करतात आणि सर्व विधी करतात. या मंदिराची काळजी घेणारे हाजी मतिबर रहमान यांनी देखील सांगितले की ‘भगवान शिव’ हे त्यांच्या आजोबासारखे आहेत.

मतीबर रहमान म्हणाले की, “मी महादेवाला नाना (आईचे वडील) म्हणतो. हे 500 वर्षे जुने मंदिर आहे, आमचे कुटुंब या मंदिराची देखभाल करते. हिंदू आणि मुस्लिम – दोन्ही धर्माचे लोक येथे प्रार्थना करण्यासाठी येतात.”

मुस्लिम ‘दुआ’ करतात तर हिंदू येथे ‘पूजा’ करतात. येथे सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात,” ते पुढे म्हणाले. रेहमान यांनी असेही सांगितले की, ते स्वतःसुद्धा याच मंदिरात दुआ करतात.

मंदिरात येणारे भाविकही या रहमान कुटुंबाच्या समर्पणाची प्रशंसा करतात आणि आता आसाममध्ये हे मंदिर हिंदू-मुस्लिम सलोख्याचे प्रतीक बनले आहे.

त्याचप्रमाणे, काश्मीर खोऱ्यात, दोन मुस्लिम पुजारी, मोहम्मद अब्दुल्ला आणि गुलाम हसन, 900 वर्ष जुन्या भगवान शिव मंदिराची काळजी घेतात आणि हे मंदिर संपूर्ण खोऱ्यातील एकमेव पवित्र मंदिर आहे जिथे मुस्लिम पुजारी आहेत. गावातून काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाल्यानंतर या मुस्लिम पुजाऱ्यांनी या मंदिराची काळजी घेण्यास सुरुवात केली.

आपल्यात फूट पडण्याची धमकी देणार्‍या बर्‍याच गोष्टी असू शकतात, परंतु प्रेम, करुणा आणि मतिबर रेहमान सारखे लोक हे सुनिश्चित करतात की या शक्ती कधीही यशस्वी होणार नाहीत.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here