ऐश्वर्या जाधवने गाठले पन्हाळ्यावरून थेट विम्बल्डन

भारतातून 14 वर्षाखालील वयोगटात विम्बल्डनला खेळणारी एकमेव खेळाडू

टीम बाईमाणूस /11 जुलै 2022

टेनिसची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आपली मराठमोळी ऐश्वर्या जाधव जरी 14 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्याच फेरीत पराभूत झाली असली तरी तिच्या खेळाने आणि आत्मविश्वासाने सबंध क्रीडा शौकिनांची मने ऐश्वर्याने जिकंली आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आलेल्या रोमानियाच्या ऍण्ड्रीया सोरविरुद्ध सामना खेळताना ऐश्वर्याने सर्व्हीससह फोर हॅण्ड व बॅक हॅण्डचे वेगवान स्ट्रोकही मारले. पण नंतर तिला पराभव पत्करावा लागला असला तरी कोल्हापूरच्या ऐश्वर्याने केलेल्या खेळीने भारतभर कौतुक होत आहे.

ऐश्वर्याने गेल्या सहा महिन्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर 14 वर्षाखालील मुलींच्या गटात टेनिसमध्ये चमकदार खेळी करत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे तिची खेळी पाहून अतिशय मानाचे असलेल्या विम्बल्डन 14 वर्षाखालील मुलींच्या टेनिस स्पर्धा निवड करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने आयटीएफ जागतिक 14 वर्षाखालील मुलींची टेनिस स्पर्धा झाली होती. या स्पर्धेतील भारतीय संघातून सहभागी झालेली ऐश्वर्या जाधवने चार सामने जिंकत उपांत्य फेरीतील मुसंडी मारली होती. त्यामुळे तिची विम्बडंनसाठी निवड झाली.

पहिल्याच प्रयत्नात दमदार करून लक्ष वेधणाऱ्या ऐश्वर्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘खेळ चांगला झाला, पण दुर्दैवाने पराभव झाला, पण मी माझ्यासोबत घडलेल्या चांगल्या तसेच नकारात्मक बाबीही पाॅझिटिव्हपणे सोबत घेऊन जात आहे. विम्बल्डनमध्ये ग्रास कोर्टवर खेळण्याचा अनुभव सर्वोत्तम होता. मी पहिल्यांदाच ग्रासकोर्टवर खेळले‘.

ऐश्वर्याची प्रशिक्षक अमृता बॅनर्जी यांनी सांगितले की, 14 वर्षांखालील विम्बल्डन अजिंक्यपदासाठी निवड झालेली कोल्हापूरची ऐश्वर्या ही एकमेव खेळाडू होती. स्पर्धेचा भाग होणे हे आमच्या सर्वात महत्त्वाचे होते. तिला या ठिकाणी पाहणे हा रोमांचकारी अनुभव होता. ऐश्वर्या सातत्याने ऐतिहासिक कामगिरी करत आहे. फॉर्ममध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 13 वर्षीय ऐर्श्वयाने अंडर-14 श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे.

ऐश्वर्याने वयाच्या पाचव्या वर्षी रॅकेट हाती घेतले आणि ती 9 वर्षांची असल्यापासून स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. 2008 मध्ये जन्मलेल्या ऐश्वर्याचे आई-वडील मूळचे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील युवलुज गावचे आहेत, पण ऐश्वर्याच्या करिअरला पाठिंबा देण्यासाठी ते कोल्हापूर शहरात आले. ऐश्वर्या जाधवचे वडील दयानंद जाधव हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका येवलुज गावचे रहिवासी आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी 2001 साली कोल्हापूर शहराच्या कारंडे माळ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत सध्या या त्यांच्या घरात ऐश्वर्याने शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धामध्ये अनेक बक्षीसांची कमाई केली आहे. या बक्षीस ट्रॉफी ठेवण्यास जागा देखील नाही. तिच्या यशाचे श्रेय ती तिच्या कुटुंबाला देते.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here