ढिम्म व्यवस्था आणि माणसांचा शिक्षणासाठीचा संघर्ष

कोण देणार प्रतिसाद? राजकारणी, नोकरशहा, न्यायव्यवस्था, ओपिनियन मेकर्स, आर्थिक धोरण प्रभावित करणारे थिंक टँक्स…. यादी मोठी आहे

  • संजीव चांदोरकर

खालच्या फोटोत केरळ मधील आदिवासी पाड्यावरील लहान मुले पावसामुळे पूर आलेल्या जवळच्या नदीतून वाट काढत शाळेत जात आहेत; जवळपास प्रत्येक मुलाबरोबर त्यांच्या आया किंवा कोणीतरी जवळची स्त्री आहे.

हे फक्त केरळमधील चित्र नाही तर देशाच्या कोणत्याही दुर्गम, अविकसित प्रदेशाचे प्रातिनिधीक चित्र आहे;

पावसाळा व कोणत्याही नैसर्गिक आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत कोट्यवधी सामान्य नागरिक/आई, वडील आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी त्या मुलांचा/स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. एव्हडेच नाही तर पोटाला चिमटा काढत, वेळ पडली तर जमिनीचा तुकडा विकून मुलांना उच्चशिक्षण देखील देतात.


हे नवीन आहे; आपल्या देशात अगदी अलीकडेपर्यंत 80% नागरिकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता, तेथे फक्त एक दोन पिढ्यात “लीप फ्रॉगिंग” (Leapfrogging) करत हे समाजघटक शिकण्यासाठी लागेल तो त्याग करायला तयार झाले आहेत.

हे चित्र फेसबुकवर उर बडवण्यासाठी/वाचणाऱ्यानी भावनिक व्हावे म्हणून नाही टाकलंय; तर समाज म्हणून, राष्ट्र म्हणून, अर्थव्यवस्था म्हणून या कोट्यवधी नागरिकांच्या चेतलेल्या आकांक्षांना काय प्रतिसाद दिला जातोय यावर


कोण देणार प्रतिसाद? राजकारणी (Politician), नोकरशहा (Servants), न्यायव्यवस्था (Judiciary System), ओपिनियन मेकर्स (Opinion Makers), आर्थिक धोरण प्रभावित करणारे थिंक टँक्स (Think Tanks)…. यादी मोठी आहे

विरोधाभास हा आहे कि वरच्या यादीतील अनेक जण, किमान त्यांचे आई वडील, स्वतः सरकारी पैशातून चालवलेल्या शाळा कॉलेजमधून शिकलेले आहेत.

पण आपल्यासारख्या हालअपेष्टा देशातील इतर समाजघटकांना काढाव्या लागू नयेत असा विचार त्यांच्या मनात न येता, आम्ही ज्या हालातून गेलो त्यातून इतरांनी देखील जावे असा उफराटा विचार अनेकांच्या मनात असतो;

सामान्य नागरिकांनी आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत नक्की कसा विचार करावा याला निर्णायक आकार देण्यात नवउदारमतवादाची अल्टिमेट ताकद आहे


शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय कमी अर्थसंकल्पीय तरतुदी करणारा भारत आहे हे आकडेवारी सांगत आहे.

शिक्षणात देशाने गुंतवणुकी केल्या तर इतर अनेक मार्गाने देशाला नजीकच्या काळात मोठा परतावा/रिटर्न (Return) / डिव्हिडंड (Dividend) मिळतो हे सर्वाना माहित आहे.

पण ढिम्म; कोट्यवधी गरीब नागरिकांना आयस्क्रीम खावेसे वाटणे आणि आपल्या मुलांना जास्तीतजास्त शिक्षण देण्याचे स्वप्न बघणे यात उथळ मार्केट तत्वज्ञान फरक करत नाही आणि दोघांमध्ये (आणि इतरही ठिकाणी) धंदा करण्याची, नफा कमावण्याची संधी म्हणून बघते आणि हे उथळ आर्थिक तत्वज्ञान लाखो मध्यमवर्गीयांनी शिरोधार्य मानले आहे हि जगाची/ भारताची शोकांतिका आहे.

——————————————————————————————————-

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here