फायदे प्रभावी बॉडी लँग्वेजचे !

तुमची देहबोली ही तुमच्यासाठी संवादाचे कामं करते. प्रभावी देहबोली ही तुम्हाला नोकरीच्या मुलाखतीपासून ते बढतीच्या संधी ह्या सर्व टप्प्यांवर मदत करते.

 • मेघना धर्मेश

देहबोली (body language) हा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहे. जसे आपण सवांदासाठी भाषा शिकतो, बोलतो, तसे आपले वागणे, चेहऱ्यावरील भाव, देहबोली हे देखील सवांदाचे महत्वाचे कार्य करतात. उदाहरणार्थ, कार्यालयात एका महत्वाच्या विषयाची मिटींग चालू आहे. सर्वजण व्यवस्थित चर्चेत आपले मुद्दे मांडत होते, बाकीच्यांचे ऐकून घेत होते. पण ह्या सगळ्यांत राधा मात्र हाताची घडी घालून, डोक्यावर आठ्या अशी मीटिंगला बसली होती. सगळ्यांना तिच्या देहबोलीमुळे सहज समजत होतं तिला होणाऱ्या चर्चेत काहींचं स्वारस्य नाही.

तुमची देहबोली ही तुमच्यासाठी संवादाचे कामं करते. तुम्ही कुणाचं कौतुक करताय पण चेहऱ्यावर मात्र काही आनंदाचे भाव नाही म्हणजेचं शब्द आणि भावना याचा काही मेळ नाही तर कसे समोरच्यांपर्यंत ते पोहचणार? ह्याचाचं अर्थ तुम्हाला तुमचे बोलणे तसे हावभावं ठेवायला हवे, नाहीतर चुकीचा संदेश जाऊ शकतो. प्रभावी देहबोली ही कॉर्पोरेट जगात तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरते. जितकी तुमची देहबोली सकारात्मक तितके तुमच्यासाठी चांगले. प्रभावी देहबोली ही तुम्हाला नोकरीच्या मुलाखतीपासून ते बढतीच्या संधी ह्या सर्व टप्प्यांवर मदत करते.

संबंधित वृत्त :

प्रभावी देहबोलीसाठी काय करता येईल ते बघूया :

 • बोलताना पुढच्या व्यक्तीकडे बघा (Maintain good eye contact ),नजर चुकवू नका.
 • आपले बोलणे आणि आपली देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव ह्यात मेळ असावा.
 • Presentation करताना चेहऱ्यावर ताण दिसता काम नये, चेहरा रिलॅक्स असू देतं.
 • बसताना, उभे रहाताना body posture ताठ, सरळ ठेवा.
 • हँडशेक करताना हात फर्म ठेवा.
 • हाताची घडी हे सांगते की आजूबाजूच्या गोष्टीशी तुमचे काही देणे-घेणे नाही. तेव्हा हे टाळलेले नक्कीचं चांगले.
 • चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे, पाय हलवणे, पेनाशी खेळणे हे टाळा.
 • खांदे पाडून चालू नका,बसू नका त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी आहे हे जाणवते.
 • मान हलवून किंवा हसणे यासारख्या साध्या कृतींद्वारे तुम्ही होकार दर्शवू शकता .
 • बोलताना खूप हातवारे करू नका. बोलताना चेहऱ्यावर हलकसं स्मित असू देतं.
 • तुम्ही पुढच्या व्यक्तीचे बोलणे ऐकतं आहात हे त्या व्यक्तीपर्यंत पोहचू देतं.
 • कामाच्या वेळेस फोन सायलेंट मोड वर ठेवा,सतत फोनकडे पाहू नका.
 • प्रतिसादाचा अभाव हेचं दाखवते,की तुमचे लक्ष नाही.
 • चेहऱ्यावरील नकारात्मक भाव टाळा.
 • पाठीवर कौतुकाची थाप हे देखील महत्वाची आहे.
 • जेव्हा योग्य असेल तेव्हा हसा. आपल्या- tone वर काम करा.
 • स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोला.

देहबोलीमुळे आपण काय बोलतो, कसे बोलतो ह्यावर लोकांच्या काय अभिप्राय हे समजायला मदत होते. आपल्या भावना म्हणजेचं तणाव, भीती, आनंद , दुःख, उत्साह हे आपल्या देहबोलीतून व्यक्त होते. बोलणे हे व्यक्तिमत्वाचा गरजेचा घटक आहे तसेचं आपली सकारात्मक देहबोली देखील आपल्या व्यक्तिमत्वासाठी महत्वाची आहे. नम्रता, शांतपणे मत मांडणे, बोलण्यात आक्रमकता टाळणे, गरज नसताना प्रतिक्रिया न देणे, ह्यांवर सकारात्मक देहबोली साठी कामं करता येईल. देहबोलीतून आपला आत्मविश्वास दिसतो. तुम्ही कितीही तयारी करून आलात पण मुलाखतीच्या वेळेस आपल्या चेहऱ्यावर ताण दिसला,तर बाजी पलटू शकते. त्यामुळे आपल्याला ह्यांवर सकारात्मक परिणामांसाठी कामं करणे महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीशी बोलताना आपणं किती अंतर राखतो हे देखील महत्वाचे आहे.

चुकीच्या देहबोलीने गैरसमजदेखील होऊ शकतात. योग्य देहबोली आपल्याला आपले ध्येय साध्य रण्यासाठी मदत करते, अडचणी सुटतात आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही समस्यांवर मात करू शकता आपल्या करिअर प्रगतीसाठी, समाजात वावरताना, वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रभावी देहबोली नक्कीचं फायदेशीर ठरते. तुमच्या शब्दांपेक्षा तुमची देहबोली बोलते हे लक्षात ठेवा. आपली सकारात्मक देहबोली, वृत्ती ही आपल्याला एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून ओळख देते. शाब्दिक नाही तरी खूप काही सांगणारी अश्या ह्या देहबोलीचे महत्व समजा आणि योग्यं वापर करा! आपल्या वागण्याला, देहबोलीला लोकांनी thumbs up द्यावा ह्यांवर नक्की कामं करता येईल.

मोबाईल – 9321314782
ईमेल – meghana_25@hotmail.com

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here