जगा – आनंदाने!

वर्तमानातल्या प्रत्येक क्षणी एकाग्रतेने काम करण्याची सवय लागली की एकाच वेळेला बर्याच कामांचा यशस्वीपणे फडशा पाडता येतो. आजच्या या अधिक गुंतागुंतीच्या जीवनात एकाग्रता, वेळेचे व्यवस्थापन, नातेसंबंध, स्वभाव, सकारात्मक मानसिकता अशा एक ना अनेक गोष्टींच्या समतोल राखून आनंदी जीवन जगण्यासाठीच्या काही टिप्स...

 • मेघना धर्मेश

कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही? प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या, अडचणी असतात. होतं काय आजचा क्षण जगण्यापेक्षा आपणं उद्याची चिंता करतो आणि त्यामुळे आजचा आनंद पण गमावून बसतो. जर आपल्याला जीवन पूर्णपणे, आनंदाने जगायचे असेल तर महत्वाचे म्हणजे आपल्याला वर्तमानात (Present) राहयला हवे. पुढे काय होईल? कसे होईल अशी भविष्याबद्दल चिंता करण्यापेक्षा आणि भूतकाळात रमण्यापेक्षा आज जे आहे असे आहे हे लक्षात घेऊन आपण प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतला पाहिजे. खरंतर जे लोक वर्तमानात जगतात ते जास्त आनंदी, अधिक आशावादी आणि सकारत्मक, कमी दुःखी, उदासीन म्हणजेचं एकूणच जीवनात जास्त समाधानी असतात.

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी

 • व्यक्त व्हा, समस्या आपल्या जवळच्या व्यक्तीशी share करा .
 • ध्यान, योगा, व्यायाम करा. निरोगी जीवनशैली जगा.
 • (Deep Breathing) खोल श्वास देखील फायद्याचे ठरतं.
 • आयुष्यातल्या गोष्टींसाठी कृतज्ञता (Gratitude) असू द्या.
 • कृतज्ञता जर्नल लिहा.
 • समस्यांपेक्षा आनंदावर लक्ष केंद्रित करा.
 • तुम्ही तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही.
 • इतरांचे ऐकू नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या.
 • सकारात्मक विचार सकारात्मक कृती पर्यंत नेतात.
 • तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही.
 • कमी अपेक्षा ठेवा.
 • रोज काहीतरी नवीन शिका.
 • शक्य असल्यास इतरांना मदत करा.
 • तुमची मानसिकता बदला, तुमच्या सवयी सुधारा.
 • मनापासून प्रशंसा करा.
 • अश्या गोष्टी करा ज्या तुम्हाला समाधान देतात .
 • संयम आणि स्थिरतेसाठी प्रयत्न करा, ज्याचा आपल्याला कायम उपयोग होईल.
 • सकारात्मक लोकांससोबत रहा.
 • तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
 • व्यस्त रहा, सक्रिय व्हा आणि उद्देशाने जगा.

चिंता, काळजी हाताळण्यासाठी आपल्याला समस्येवर फोकस न करता आपल्याला समाधान शोधायचे असते. जास्त काळजीमुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नष्ट होते. सकारात्मक दृष्टीकोन आणि सकारात्मक विचार ह्यांवर कामं करून आपल्याला मार्ग शोधायचा असतो. आनंदी लोक ते नसतात ज्यांच्याकडे सर्व काही आहे, परंतु जे त्यांच्याकडे आहे त्यामध्ये ते आनंदी असतात. समाधानासाठी, भविष्यातील कल्याणासाठी चांगल्या सवयी आपल्याला मदत करतात. ह्यांत शिस्त, समर्पण, दृढनिश्चय, सहकार्य, सर्जनशीलता, आपल्या भावनांवर नियंत्रण, छंद, कला ह्यासाठी वेळ द्यावा लागतो, स्वतःवर कामं करावे लागते. एक महत्वाची सवय लावावी लागते ती म्हणजे तक्रार न करणे. आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा असतो. Growth Mindset आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेण्यास मदत करतं.

जेव्हा आपण वेगवेगळ्या पर्यायांमधून एक पर्याय निवडतो तेव्हा निवड करताना लक्षात ठेवा तुमचे समाधान, आनंद आणि आत्मीय शांती हे महत्वाचे असणारं आहे. वर्तमान म्हणजे Present म्हणजे गिफ्ट, तेव्हा ह्या क्षणाचा आनंद घ्या. आजचा विचार करा. आयुष्यात Rush करू नका, पळू नका, थांबा निसर्गाचा आनंद घ्या, मनापासून जीवन जगा. स्वतःसाठी जगा, स्वतःला प्राधान्य द्या. हसा आणि खंबीर रहा. छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊन स्वतःला त्रास करू नका. नेहमी तक्रार करणारा स्वभाव गोष्टी बिघडवू शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी नकारात्मक असण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीत समस्या शोधू नका.

आजचे जीवन हे अधिक गुंतागुंतीचे आहे. स्पर्धात्मक जग, स्वतःला सतत सिद्ध करण्याचा दबाव आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तणाव या सर्वांमुळे वर्तमान क्षण जगणे अधिक कठीण होतंय. बहुतेक वेळा आपण अस्वस्थ होतो, तणावात असतो, कारण आपण बदल स्वीकारायला तयार नसतो. तुम्ही बदल करू शकत नसल्यास ते स्वीकारा. जर तुम्ही बदल करू शकत असाल तर तो बदल व्हा, पण चुकीच्या निर्णयाने तडजोड करू नका. राग, चिडचिड हे आपणं नक्कीचं नियंत्रित करू शकतो. तर वेळेचे व्यवस्थापन करा, क्षमा करायला शिका, नातेसंबंध जोपासा, सकारात्मक राहा, होसले बुलंद ठेवा, सकारात्मक मानसिकतेसह समस्यांचा सामना करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वर्तमानात जगा आणि आनंदी रहा! लहान लहान यश साजरे करा बघा तुम्हाला आयुष्य सुंदर वाटेल!

Cherish every single day of your life!

मोबाईल – 9321314782
ईमेल – meghana_25@hotmail.com

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here