‘12th fail’ : आयुष्याला ‘रिस्टार्ट’ करण्याचा एक सहज व सोपा मूलमंत्र…

12 वी फेल आपल्या पुढे स्पर्धा परीक्षेचे खतरनाक जग काही मोजक्याच पण प्रभावशाली प्रसंगातून उभे करतो. या जगात अपयशी ठरलेल्या तरुणांची जगण्याची धडपड दिसते. त्यांचे प्रयत्न, कष्ट व स्वप्नांचा पाठलाग दिसतो. तुटलेली व जुळलेले प्रेम प्रकरण दिसतं. स्वार्थीलोलुप माणसांचे स्वभावदर्शन दिसते. पण त्याच बरोबर अपयश आल्यास आयुष्याला ‘रिस्टार्ट’ करण्याचा एक सहज व सोपा मूलमंत्रही मिळतो.

  • सुजय शास्त्री

स्पर्धा परीक्षेच्या जगात ज्यांनी आपल्या आयुष्यातील, तारुण्याची महत्त्वाची वर्षे खर्च करून अपयश मिळवले असेल अशा लाखोंसाठी विधु विनोद चोप्राचा ‘12th Fail’ हा सत्य घटनेवर आधारीत सिनेमा एक इमोशनल टच आहे. हा सिनेमा 90 च्या दशकात चंबळच्या खोऱ्यातून पोलिस ऑफिसर बनण्याचे स्वप्न असणाऱ्या एका तरुणाच्या प्रचंड मानसिक व शारीरिक कष्टाचे चीज दाखवणारा चरित्रपट आहे. महाराष्ट्र केडरमधील IPS मनोज शर्मा यांच्या खडतर संघर्षावर या सिनेमाची कथा बेतलेली आहे.

पण या सक्सेस स्टोरी सोबत अपयशी ठरणाऱ्यांवरही तो अप्रत्यक्ष भाष्य करतो. आयएएस, आयपीएसची स्वप्नं साकार करण्यासाठी गावखेड्यातून, दुर्गम भागातून, निमशहरातून लाखो तरूण दिल्ली, मुंबईत अभ्यासाला येतात. त्यांच्या हातात व्यवहारिक जगतात काडीचीही किंमत नसलेली पण यूपीएससीला महत्त्वाची वाटणारी केवळ डिग्री असते. या कागदावर मग या तरुणांची सनदी सेवक होण्याची स्वप्नं उभी राहतात. ही स्वप्न साकार करण्यासाठी पोरं थोर उद्योजक नारायण मूर्ती सांगतात, त्यापेक्षा अधिक 18-18 तास अभ्यास करत असतात. बरं हा अभ्यास करून पैसे मिळतील किंवा एखादे अवॉर्ड मिळेल असाही नाही की, ते लॉटरीचे तिकिटही नाही. (लॉटरीचे तिकिट आयुष्यात रोज काढू शकतो यूपीएसएसीला मर्यादा आहेत) एका स्वप्नाच्या दिशेने ती केवळ वाटचाल आहे. या वाटचालीचा कोणताही आखीव रेखीव, नीटनेटका, खडतर असा मार्ग नाही की फॉर्म्युला नाही. स्पर्धा परीक्षेचे जग हे एक विवर आहे. या विवरात परीक्षार्थी अडकतो ज्याला या विवरातून बाहेर पडता येतो तो लाखातून एक आयएएस, आयपीएस होतो व उरलेले त्याच विवरात आपापल्या परीने मार्ग शोधत राहतात.

12th fail - baimanus

‘रिस्टार्ट’ करण्याचा एक सहज व सोपा मूलमंत्र

12 वी फेल आपल्या पुढे स्पर्धा परीक्षेचे खतरनाक जग काही मोजक्याच पण प्रभावशाली प्रसंगातून उभे करतो. या जगात अपयशी ठरलेल्या तरुणांची जगण्याची धडपड दिसते. त्यांचे प्रयत्न, कष्ट व स्वप्नांचा पाठलाग दिसतो. तुटलेली व जुळलेले प्रेम प्रकरण दिसतं. स्वार्थीलोलुप माणसांचे स्वभावदर्शन दिसते. पण त्याच बरोबर अपयश आल्यास आयुष्याला ‘रिस्टार्ट’ करण्याचा एक सहज व सोपा मूलमंत्रही मिळतो. पण या उप्पर हा सिनेमा ईमानदारी, तत्वनिष्ठा हे शाश्वत मूल्य अधिक ठळकपणे अधोरेखित करतो.

आपली बलाढ्य, स्टील फ्रेम समजली जाणारी प्रशासकीय व्यवस्था अनेक अंतर्विरोधाने भरलेली आहे. या स्टील फ्रेममध्ये संख्येने खूप कमी अधिकारी व कर्मचारी वर्ग ईमानदार दिसतो. ती ईमानदारी या लोकांच्या संघर्षमय जगण्यातून त्यांच्या कर्तव्यात आलेली असते. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्माला घातलेल्या राज्य घटनेतल्या मूल्यांवर असलेल्या नितांत श्रद्धेतूनही आलेली आहे. हीच मूल्यं आपला भारत देश, समाज, लोकशाही अधिक समृद्ध करण्याची खरी शक्ती आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्माता विधु विनोद चोप्राचा हा सिनेमा अशा आशावादावर आपल्याला भिडतो व अशाच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या हाती देश असल्याने आपण सुखाने श्वास घेत आहोत असेही अखेरीस सुचवतो.

परिंदा सारखा अजरामर सिनेमा देणाऱ्या विधु विनोद चोप्रासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाची ही सेकंड इनिंग या दमदार सिनेमाच्या निमित्ताने सुरू झालेली असावी असे वाटते इतका जिवंतपणा त्याने या सिनेमात आणला आहे. आयपीएस अस्पॅरंट मनोजची भूमिका साकारणारा विक्रांत मेस्सी तर अफाटच आहे. त्याच्या सोबतचे परीक्षेत अपयशी ठरलेले मित्र, त्याची प्रेयसीही आपल्या लक्षात राहतात इतका कसदार अभिनय या सर्वांचा आहे.

12th fail - baimanus

ज्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनला ते मनोज शर्मा कोण आहेत?

महाराष्ट्र केडरमधील IPS मनोज शर्मा यांची कथा या देशातील प्रत्येक तरुणांसाठी एक उदाहरण आहे. त्यांचे स्वत: चे मित्र अनुराग पाठक यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. ‘12th फेल, हारा वो जो लढा नहीं’ या पुस्तकात मनोज शर्माच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाची नोंद आहे.

बारावीत सर्व विषयात नापास

मनोज शर्मा हे 2005 बॅचच्या महाराष्ट्र केडरचे आयपीएस आहेत. सध्या ते मुंबईत पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या बालपणीची कहाणी खूप संघर्षमय आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात झाला. अभ्यासादरम्यान ते नववीत, दहावी आणि अकरावीच्या तृतीय विभागात उत्तीर्ण झाले. 11वी पर्यंत कॉपी करुन ते पास झाल्याचे बोलले जात आहे. परंतु बारावीच्या परीक्षेत कॉपी करता न आल्याने ते फेल झाले. एका व्हिडिओ मुलाखतीत त्याने सांगितले की, आम्ही बारावीमध्ये फसवणूक करून जाऊ असे आम्ही ठरवले होते. गाईड कोठे ठेवायचे, स्लिप कुठे लपवायची हे आम्हाला माहित होते. असा विचार केला की बारावी उत्तीर्ण झाल्यावर टाइपिंग शिकल्यानंतर मी काही काम करेन. परंतु परिसरातील एसडीएमने शाळेला लक्ष्य करुन कॉपी करण्याची परवानगी दिली नाही. मग मी विचार केला की एवढा मोठा माणूस कोण आहे की, सर्वजण त्याचे म्हणणे स्वीकारत आहेत. मग मी देखील तसेच पॉवरफुल व्यक्ती बनविण्याचे ठरविले.

12th fail - baimanus

नागरी सेवेत जाण्याचा निर्णय

ते पुढे म्हणलेकी, बारावीत नापास झाल्यावर मी व माझा भाऊ भाकरीसाठी टेम्पो चालवायचो. एक दिवस आमचा टेम्पो तिथेच अडकला, म्हणून मला वाटले की, एसडीएम यांना सांगून आपण टेम्पो सोडवू शकतो. परंतु त्यांच्याकडे गेल्यानंतर टेम्पोबद्दल बोलण्याऐवजी मी तुम्ही परीक्षेची तयारी कशी केली याविषयी बोललो. मी आता यातच भविष्य करेल असा मनोमनी विचार केला. काही दिवसातच ते घरून बॅग घेऊन ग्वाल्हेरला आले. येथे पैसे आणि खर्च नसल्यामुळे मी मंदिर भिकाऱ्यांजवळ झोपत असे. मग एक वेळ अशीही आली जेव्हा माझ्याकडे खायला देखील नव्हते. पण नशीब इथे होते की मला लायब्रेरिअन कम शिपायाची नोकरी मिळाली. जेव्हा कवी किंवा विद्वानांच्या बैठका होत असत तेव्हा मी त्यांच्यासाठी सतरंजा अंथरण्याचे आणि पाणी देण्याचे काम करायचो. परंतु एसएमडी बनायचे आहे हे ठरविल्याने तशी तयारी करण्यास सुरुवात केली. पण बारावी फेल टॅगने माझा पिछा सोडला नाही. अगदी ज्या मुलीवर तो प्रेम करतो त्या मुलीलाही ते मनापासून सांगू शकत नव्हतो, कारण तिने बारावी फेल आहे, असे म्हणून नये. म्हणून अभ्यास सुरू केला.

12th fail - baimanus

वाचनालयातील शिपायाचे काम

एक वेळ अशी आली की मनोज शर्मा यांच्याकडे खायलाही पैसे नव्हते, म्हणून त्यांनी लायब्ररीत काम केले. तेथे त्यांनी ग्रंथपाल कम शिपाई म्हणून काम केले. यावेळी त्यांनी अनेक विचारवंतांबद्दल वाचले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, SDM पेक्षा मोठ्या परीक्षेची तयारी करता येते. त्यामुळे त्यांनी मोठी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

मैत्रिणीला सांगितल्यावर – मी जग बदलेन

मनोज 12 वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले, पण तो आपले प्रेम व्यक्त करू शकले नाही आणि आपले एकतर्फी प्रेम कुठेतरी संपुष्टात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र, शेवटी तू हो म्हण आणि मी सारे जग फिरवीन, असे म्हणत त्याने मुलीला प्रपोज केले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी लग्न देखील केले. यूपीएससीच्या तयारीदरम्यान, त्यांना त्यांची पत्नी श्रद्धा, जी पूर्वी त्याची गर्लफ्रेंड होती, हिने खूप पाठिंबा दिला. त्यांची पत्नी श्रद्धा देखील भारतीय महसूल सेवेत अधिकारी आहे.

12th fail - baimanus

मेहनती आयपीएस अधिकारी

मनोज कुमार शर्मा यांनी युपीएससीचे एकापाठोपाठ चार प्रयत्न केले. यातील पहिल्या तीन प्रयत्नांत तो अपयशी ठरला होता. पण चौथ्या प्रयत्नात तो ऑल इंडिया 121 रँक (IPS मनोज कुमार शर्मा रँक) सह IPS होण्यात यशस्वी झाला. ते सध्या मुंबई पोलिसांमध्ये अतिरिक्त आयुक्त (IPS मनोजकुमार शर्मा करंट पोस्टिंग) म्हणून कार्यरत आहेत. आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्या दबंग शैलीमुळे काहीजण त्यांना सिंघम म्हणतात तर काहीजण त्यांना सिंबा म्हणतात.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here