- मेघना धर्मेश
आज जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो दररोज एक तरी स्त्रियांच्या अत्याचाराची बातमी असते. कुठे तिला जाळलं जातंय, कुठे तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकलं जातंय, कुठे हुंड्यासाठीं तिचा छळ केला जातोय, कुठेतरी मुलगी आहे म्हणून पोटातच तिच्या आयूष्याचे दोर कापून टाकतायतं. बलात्कार, विनयभंग ह्याची तर गणतीचं नाही. शिवाय तिने आपल्याविरुध्द्व आवाज उठवू नये, आपली तक्रार करू नये म्हणून तिला जिवंत राहायचा अधिकार नाही. मग तिला मारूनचं टाका. नेहमीसाठीच तिचा आवाज बंद होइलं आणि काय कोणाला फरक पडणार आहे. ही वाईट वृत्ती आणि भयंकर विकृती आज समाजात वणव्यासारखी पसरत आहे. ना कुठे तिचा अंत दिसतोय ना कुठे तिला मुळापासून उपटून काठण्यासाठी काही ठोस उपाय योजना केली जाते आहे.

घरात, रस्त्यावर, ऑफिस मध्ये कुठेच स्त्री स्वतःला सुरक्षित म्हणू शकत नाही आणि खरं तर नाही सुद्धा. घरी-दारी शाररिक आणि मानसिक छळ हे स्त्रियांच्या आयुष्याचा भाग झालाय अशी आज परीस्थिती आहे. ह्यात शिक्षण, घरची परीस्थिती, कमावती, घरी असणारी, उच्च/मध्यम वर्ग, वस्तीतली ह्याचा काहीचं संबंध नाही, एकचं आहे ती स्त्री आहे. आपलं पूर्ण घर सांभाळणारी, आलेले पाहुणे, घरातल्यांची आजारपण, सणवार, मुलांच्या परीक्षा, नवऱ्याचे मूड्स अश्या सगळया आघाडीवर लढणारी स्त्री आज जे काही सहन करतेय त्याची तुलना कशाशीचं होऊ शकत नाही. हि झाली Home Front ची गोष्ट.
ऑफिस मध्ये सुद्धा वेगळं काही चित्र नाही. Lady बॉस अजूनही बऱ्याच ऑफिस मध्ये स्वीकारली जातं नाही. स्त्री म्हणून होणाऱ्या हेटाळणीला, शेरेबाजीला तिला आज पण समोर जावं लागतंय. तीच्या कर्तृवापेक्षा साहेबांच्या मर्जीतली म्हणुन हो मिळालं असेल प्रमोशन हेच तिला ऐकावं लागत. का? तीच शिक्षण,मेहनत कौशल्य, प्रामाणिकपणा, घर-ऑफिसची तारेवरची कसरत, घरी मुलं आजारी असताना सुद्धा उशिरा पर्यंत थांबून पूर्ण केलेली कामे ह्याची किंमत शून्य?
8 मार्च, जागतिक महिला दिन दरवर्षीच येतो नाही का? ह्या एका दिवसासाठी स्त्रीला उत्सवमूर्ती बनवायचं, पुरस्कार, सन्मान, कौतुक सोहळा असं 8 मार्च, महिला दिनाचं So called Celebration वर्षानुवर्षे करायचं आणि बहुतेक करत सुद्धा राहू? ह्या एका दिवसाच्या आदर, सत्कारापेक्षा खरंच महिलांना काय हवं आहे हे बघण्याची आणि समजवून घेण्याची, समाजाच्या आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. तिला देवी बनवून पूजा नकोय तर सर्वप्रथम एक व्यक्ती, माणूस म्हणुन स्वीकारा. तिला तिच्या अस्तित्वाची दररोजची लढाई लढायला लावू नका.

स्त्री श्रेष्ठ कि पुरुष हा वादाचा मुद्दा नसावा, दोघेही ह्या समाजाचे भक्कम खांब आहेत. याचा श्रीगणेशा प्रत्येकाच्या घरातूनचं व्हायला हवा, नाही का? आपले मुलगे वाढवताना मुलींचा, स्त्रियांचा आदर करा हेंच संस्कार मुलांत रुजवा आणि हे तुमच्या वागण्या-बोलण्यात मुलापर्यंत पोहचवा. घर-ऑफिस मध्ये तिचा होणारा मानसिक, शाररिक छळ, लैगिक अत्याचार हे पुरुषांची मानसिकता,स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे जरुरी आहे हेचं सांगतो. स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने समाजात दिसू देत. बोलण्याची वेळ कधीच गेली आता वेळ करून दाखवण्याची.. Gender Equal जग हि नव्या जगाची साद असू दे, ठरू दे. सुरवात करूया विचार,दृष्टीकोन, मानसिकता बदलण्याने, सुरक्षित वातावरण निर्माण करून, रूढी-परंपरांचे पाश मोकळे करून, स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या खऱ्या अर्थाने समजून, अंमलात आणून. पुरस्कार, सोहळे, महिला दिन कार्यक्रम यांची ना नाही पण खरा पुरस्कार,सन्मान असेल जेव्हा बाई माणूस म्हणून जगेल. मगच आपण खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करतोय असं म्हणू शकू! 8 मार्च का?? येणारा प्रत्येक दिवस महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस असू देतं.
“मंजिल मुश्किल तो है
पर असंभव नही
रास्ता लंबा तो है
पर शुरुवात तो करनी है”
संपर्क : 9321314782 | meghana_25@hotmail.com
मस्त