बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचं वर्चस्व

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा गौप्यस्फोट

टीम बाईमाणूस / 27 जून 2022

कॅन्सरवर मात करून पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये दमदार ऐन्ट्री मारणाऱ्या सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड (Bollywood) यांच्यातील कनेक्शनबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचं वर्चस्व असल्याचं स्पष्टपणे सोनालीने सांगितले.

एक काळ असा होता त्याक्षणी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डचे वर्चस्व होते असं म्हटलं जातं. चित्रपटांवर अंडरवर्ल्डचा पैसा वापरला गेला. मीडिया रिपोर्टनुसार निर्माते, दिग्दर्शकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी अंडरवर्ल्डच्या दबावाखाली काम केले मात्र काळ बदलला तशी ही काळी छायाही इंडस्ट्रीपासून दूर गेली. त्यावेळी काही कलाकारांनीही याविरोधात आवाज उठवला होता. आता इतक्या वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे याबाबत उघडपणे बोलली आहे. ‘द रणवीर शो’ (The Ranveer Show) या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये सोनालीने हजेरी लावली होती. यावेळी ती बॉलिवूडमधील अनेक विषयांवर स्पष्टपणे बोलताना दिसली. सोनालीने कबूल केले की 90 च्या दशकात दिग्दर्शकांवर अंडरवर्ल्डचा दबाव होता. ज्यामुळे काही कलाकारांना अनेक चित्रपटांसाठी नकार देण्यात आला होता. सोनालीने सांगितले की, दिग्दर्शक स्पष्टपणे सांगायचा आणि तो काहीही करू शकत नव्हता.

सोनाली पुढे म्हणाली की, अनेक ठिकाणांहून चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले जात होते. बेकायदेशीरपणे पैसे येत होते. साहजीकच बँका तुम्हाला तेवढे पैसे देणार नाहीत याची त्यांनाही मर्यादा होती. माझ्याबद्दल सांगायचे तर जिथे मला काहीतरी चुकीचे आहे असे वाटायचे तिथं मी साउथमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. या अभिनेत्रीने पुढे सांगितले की ती नेहमी स्वत:ला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि यामध्ये तिचा बॉयफ्रेंड गोल्डी बहल याने खूप मदत केली. सोनाली म्हणाली की ‘गोल्डीला चांगल्या आणि वाईट फिल्म फायनान्सर्सची चांगली समज होती. कारण त्याचे कुटुंब या व्यवसायाशी निगडीत होते.

अंडरवर्ल्डच्या दबावामुळे अनेक भूमिका तिच्या हातून गेल्याचा खुलासाही सोनालीने केला. ती म्हणते ‘कधीकधी असं व्हायचं की मला ज्या भूमिका करायच्या होत्या त्या नंतर दुसऱ्याला सोपवल्या जायच्या. कारण निर्मात्यांना कुठूनतरी फोन यायचे. त्यावेळी दिग्दर्शक आणि सहकलाकार फोन करायचे आणि म्हणायचे की ‘आम्ही समजतो परंतु आमच्यावर देखील दबाव आहे त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही’. सोनाली बेंद्रे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द ब्रोकन न्यूज‘ (The Broken News) या मालिकेत दिसली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here