मी ‘ब्रा’ कशासाठी लपवू…?

आलिया भटचा सडेतोड सवाल

  • टीम बाईमाणूस

महिलांच्या सामाजिक स्थितीवर आधारित असलेला आलियाचा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट येत्या 5 ऑगस्टला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत एक बोल्ड विधान केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आलिया म्हणाली,

महिलांना नेहमीच त्यांची ब्रा लवपवण्यास साांगितलं जातं त्याचा मला खूप राग येतो. मी ब्रा कशासाठी लपवावी, तो देखील एक कपडाच आहे. पुरुषांना कधीच त्यांची अंतर्वस्त्र लपवण्यास सांगितलं जात नाही. मला अनेकदा अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. त्यावेळी या गोष्टींकडे फारसा लक्ष दिला नाही. पण आता मी या सर्व गोष्टींवर विचार करू लागले आहे. या मुद्द्याबाबत मी जागरूक असते. मी या विषयांवर बोलते तेव्हा अनेकदा माझ्या मित्रमैत्रिणी मला बोलतात तू एवढी सेंसिटिव्ह का होतेस, तुझी मासिक पाळी सुरू आहे का? तेव्हा मी त्यांना सांगते मी सेंसिटिव्ह नाही किंवा इतरांपेक्षा वेगळी नाही आणि तुम्ही जेव्हा मासिक पाळीबद्दल बोलता तेव्हा लक्षात घ्यायला हवं की स्त्रियांना मासिक पाळी येते त्यामुळेच माणसाचा जन्मही होतो.

सध्या प्रेग्नेंसी आणि आगामी सिनेमांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री आलिया भट्ट अनेक मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडताना दिसते. एका मुलाखती दरम्यान आलियाने सोशल मीडियावर येणाऱ्या अभद्र आणि आपत्तीजनक कमेंटबद्दल मत मांडलं आहे. सोशल मीडियावर महिलांवर ज्या प्रकारे कमेंट करण्यात येतात यावर आलिया उघडपणे बोलली आहे. महिलांना समाजात अनेक चुकीच्या गोष्टींचा सामना करावा लगातो. एवढंच नाही तर, इंडस्ट्रीमध्ये देखील अभिनेत्रींनी सेक्सिज्मचा सामना करावा लागतो.

आलिया आणि रणबीर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. आलियानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तर काहींनी भन्नाट रिॲक्शन्स दिल्या. काहींनी आलिया आणि रणबीरला ट्रोल देखील केलं. एका मुलाखतीमध्ये आलियानं या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, ‘एखाद्या महिलेनं काही जरी केलं तरी ती हेडलाईन होते. आई होण्याचा निर्णय, डेटिंग आणि ट्रिप अशा काही कारणांमुळे महिला या स्पॉटलाइटमध्ये राहतात.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here