टीव्ही अभिनेत्रीने स्वत:शीच केले लग्न; म्हणते “मला पुरुषाची गरज नाही’’

  • टीम बाईमाणूस

काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या क्षमा बिंदू या युवतीने स्वतःशीच लग्न करत देशात सेन्सेशन निर्माण केले होते. आता बिंदू पाठोपाठ टीव्ही क्षेत्रातील एका आघाडीच्या अभिनेत्रीनेही स्वतःशीच लग्नाचा घाट घातला आहे. ‘दिया और बाती हम’, ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘देवी आदी पराशक्ती’ सारख्या अनेक हिट मालिकांमधील अभिनेत्री कनिष्का सोनी हिने सोशल मीडियावर या विषयी माहिती दिली आहे. कनिष्काने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सिंदूर आणि मंगळसूत्र घातलेला फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, ”मी स्वतःशी लग्न केले आहे. मी स्वतः माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत आणि मी एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करते. सर्व प्रश्नांचे उत्तर असे आहे की, मला कुठल्याही पुरुषाची गरज नाही…मी एकटी आणि एकांतात माझ्या गिटारसह नेहमी आनंदी असते… मी एक देवी आहे, बलवान आणि शक्तीशाली आहे, शिव आणि शक्ती सर्व काही आहे. धन्यवाद…

‘दीया और बाती हम’, ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘देवी आदिशक्ती’ यासारख्या टीव्ही शोमध्ये कनिष्का दिसली होती. मात्र कनिष्काने भारतीय टीव्ही इंडस्ट्रीवरील विश्वास उडाल्याचं म्हणत ती हॉलिवूडमध्ये करिअर करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ती या करिअरबाबत संभ्रमात असल्याचेही अभिनेत्रीने म्हटले. कनिष्काने मुंबई विद्यापीठातून फायनान्समध्ये एमबीए केले आहे. अलीकडेच ETimes ला दिलेल्या मुलाखतीत कनिष्काने असे म्हटले की, डेलीसोपच्या अनिश्चिततेमुळे तिचा इंडस्ट्रीवरील विश्वास उडाला. ती म्हणते की, ‘मी अनेक टीव्ही शो केले. अनेक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिराती केल्या. माझ्या हातात अनेक ऑफर्स होत्या. पण जेव्हा मला वाटले की ३ महिने चालूनही या टीव्ही शोंची शाश्वती नाही. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते.

दुसऱ्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, ‘जेव्हा मी माझी सगळी स्वप्ने पूर्ण केली तेव्हाच स्वत:शी लग्न केले. मी स्वत:च्या प्रेमात आहे. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत आणि मला कोणत्या पुरुषाची गरज नाही. मी एकटीच आनंदी आहे आणि या एकटेपणात माझ्यासोबत माझे गिटार आहे. मी मानसिकदृष्ट्या मजबूत आहे. शिव आणि शक्ती दोन्ही माझ्यामध्ये आहेत.’

कनिष्काने वाढदिवशी शेअर केलेल्या फोटोमध्ये कपाळाला सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र घातले होते. हा फोटो शेअर करत तिने, ‘मला ॲडवेंचर खूप आवडते. आणि मी आशा करते की मी रोज अशा गोष्टी करेन ज्यामधून मला आनंद मिळेल. मला असे करणे खूप आवडते. मला पार्ट्या करणे आवडत नाही. त्यामुळे शक्य होईल तितके पार्ट्यांना जाणे टाळते. आज मी स्कायडायविंग करणार आहे. हे करम्याची माझी गेल्या काही दिवसांपासून इच्छा होती. यापूर्वी मी जेव्हा भारतात होते तेव्हा ऋषिकेश येथे बंगी जम्पिंग केले होते. मला निसर्ग आवडतो‘ असे म्हटले होते.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने फिल्मी टीव्हीवरील ‘बाथरूम सिंगर’ या सिंगिग रिॲलिटी शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. मात्र, ‘दीया और बाती हम’ मधील तिच्या सूनेच्या भूमिकेसाठी तिला विशेष लोकप्रियता मिळाली. कनिष्काने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने एलआयसी ब्रँडची मॉडेल म्हणूनही काम केले होते. कनिष्का अनुप जलोटा आणि राम शंकर यांच्यासह अनेक लाइव्ह शो इव्हेंटमध्ये दिसली आहे. तिने डीडी नॅशनल शो ‘संकटमोचन हनुमान‘ मध्येही गाणे गायले होते. याशिवाय अभिनेत्रीने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायिका म्हणूनही काम केले आहे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तिला कराव्या लागलेल्या स्ट्रगलमुळे कनिष्काने KASO MUZIK नावाची कंपनी सुरू केली होती. ज्यातून तिला इंडस्ट्रीबाहेरून येणाऱ्या गायकांना मदत करता येईल.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here