आदिवासी कविता आता आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात सादर होणार

नंदुरबार येथील 'बाईमाणूस'च्या पत्रकार आणि कवयित्री सुमित्रा वसावे व कवी संतोष पावरा यांची उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी निवड

  • टीम बाईमाणूस

गोंदिया अमृत महोत्सवानिमित्त साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन दि. 3 ते 6 ऑगस्ट 2023 पर्यंत भोपाल येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी देशविदेशातून विविध भाषा बोलणारे, विविध भाषांतून लेखन करणारे जवळपास 600 साहित्यिकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या समलेनाचे अध्यक्षपदी गोंदियाच्या साहित्यिक आणि कवी उषाकिरण आत्राम यांची निवड करण्यात आली आहे. उषाकिरण आत्राम या गोंडी साहित्यिक आहे. त्यांनी आतापर्यंत गोंडी मधुन कथा, कविता सादर केलेल्या आहेत. तर भोपाळ येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी नंदुरबार येथील बाईमाणूसच्या पत्रकार तसेच कवयित्री सुमित्रा वसावे आणि आदिवासी कवी व साहित्यिक संतोष पावरा यांची निवड झाली आहे.

कवयित्री सुमित्रा वसावे या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील रहिवासी असून त्या मथवाडी व देहवाली या बोलीभाषेत कविता लिहतात. याआधी साहित्य अकादमी दिल्ली आयोजित साहित्य संमेलनात त्यांना मथवाडी व देहिवाले बोलीभाषेत लिहलेल्या कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. भोपाळ येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलसंमेलनात जगभरातील सुमारे 38 देशांतून जवळपास 70 भाषांचे कवी, लेखक, साहित्यिक आणि विचारवंत सामील होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात बाईमाणुसच्या नंदुरबार येथील पत्रकार सुमित्रा वसावे यांची निवड होणे ही बाब बाईमाणूससाठी अभिमानस्पद आहे.

शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील आदिवासी कवी संतोष पावरा हे भोपाळ येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. याआधी साहित्य अकादमी दिल्ली आयोजित साहित्य संमेलनात आदिवासी कवी व साहित्यिक संतोष पावरा यांना आपल्या कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. संतोष पावरा यांनी समाजकार्याचे शिक्षण घेतले असून, व्यसन, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, स्थलांतर, लोकशाही मूल्य, निसर्ग, आदिवासी साहित्य संस्कृती चळवळ व इतिहास आदी विषयांवर ते लिखाण करतात. ते आदिवासी एकता परिषद व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते असून 2007 साली त्यांचा ‘ढोल’ नावाचे कविता संग्रह प्रकाशित झाला आहे आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

नवीन लेख

संबंधित लेख

1 Comment

  1. गोंदिया अमृत महोत्सव काय आहे

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here