डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं ‘दी प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हे पुस्तक प्रकाशित झालं ते 1923 साली लंडनमध्ये. तेव्हा बाबासाहेब केवळ 32 वर्षांचे होते. शंभर वर्षांपूर्वी लिहलेल्या बाबासाहेबांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथातील अक्षरे जरी जुनी असली तरी पुस्तकातील सिद्धांत अतिशय ताजा आहे. त्यांच्या आयुष्यातली पहिली डॉक्टरेट ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मधून ते मिळवत होते. त्यावेळचा हा त्यांचा हा प्रबंध होता. पण या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातून उभ्या राहिलेल्या चर्चेमुळे आणि घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था उभी राहिली… रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अत्यंत महत्वाच्या अशा या प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाला आज तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण बाबासाहेबांच्या या ग्रंथाविषयी आणि त्या ग्रंथाच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांविषयी जाणून घेणार आहोत.
Babasaheb Ambedkar : भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात बाबासाहेबांच्या या पुस्तकाचं योगदान आहे !
संबंधित लेख