चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड पहाडातील आदिवासीबहुल जिवती तालुक्यात असणारे आदिम कोलाम समुदायांची गावे अजूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. रायपुर(खडकी) येथील आदिम कोलाम समुदायातील गावकऱ्यांना अजूनही नाल्यातील दुषित पाणी व विहिरीतील अळ्या पडलेले पाणी प्यावे लागत आहे. यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून पुन्हा किती दिवस डोंगराखाली उतरुन नाल्यातील दुषित पाणी, विहीरीतील अळ्या पडलेले पाणी प्यायचे साहेब? हा संतप्त सवाल गावकरी करत आहे.
नाल्यातील, विहीरीतील अळ्या पडलेले दुषित पाणी किती दिवस प्यायचे साहेब? | Chandrapur | Baimanus |
संबंधित लेख