महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणारी नर्मदा नदी आणि नर्मदा नदीवर उभारण्यात आलेला सरदार सरोवर प्रकल्प . पण डोळ्यांसमोर भलामोठा जलाशय असूनही घोटभर पाण्यासाठी सपनाला या पहाडांवर प्रचंड पायपीट करावी लागते. परिसरातील हजारो आदिवासींचीही हीच परिस्थिती आहे. या धरणावर असलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे विजेचा प्रश्न सुटला. विकास प्रकल्पाच्या नावाखाली हे सरोवर उभारलं गेलं. या सरोवराने जगाला पर्यटणासाठी देखावे उपलब्ध करून दिले मात्र इथल्या हजारो स्थानिक आदिवासींची घरं, 37 हजार हेक्टर वनजमीन आणि करोडो रुपयांची जंगल संपत्ती गिळून टाकली. याचा परिणाम हा सातपुड्याच्या पर्यावरण संतुलनावर तर झालाच पण त्याहीपेक्षा मोठं नुकसान झालंय ते आदिवासींच्या जगण्याचं, त्यांच्या मूलभूत सुविधांचं. डोळ्यांमध्ये पाण्याचं प्रतिबिंब आहे पण त्यांचा घसा मात्र कोरडाच आहे.
Maharashtra Tribal : Water Crisis Documentary | Nandurbar | Adivasi | Sardar Sarovar Dam | BaiManus
संबंधित लेख