भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनलाय. त्यातही भारताला तरुणांचा देश म्हंटल्या जातं. या तरुणांच्या शिक्षणासाठी देशात मोठमोठे विद्यापीठ, महाविद्यालये आहेत. पण तिथपर्यंत जाण्याची सुरुवात जिथून होते त्या अंगणवाड्यांची मात्र प्रचंड दुरावस्था झालीये. बीड जिल्ह्यामध्ये 2886 अंगणवाड्या आहेत त्यापैकी 1200 अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाहीए… कुपोषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या या अंगणवाड्या स्वतः च कुपोषित झाल्याचं चित्र समोर येतंय…
कुपोषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्याच कुपोषित? Beed | Maharashtra News | Baimanus |
संबंधित लेख