आज आपण 21 व्या शतकात जगतोय. पण आजही महिलांना मोठ्या प्रमाणात कौटुंबिक अत्याचाराला समोरं जावं लागतंय. महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारासंबंधी बोलत नाहीत. ग्रामीण भागात आजही बालविवाह, हुंडाबळी किंवा महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतात. संसार सोडलेल्या आणि माहेरचं दार बंद झालेल्या महिलांसाठी बीडमध्ये एक संस्था काम करतेय. अंबाजोगाई येथील मानवलोक संचलित “मनस्वीनी महिला प्रकल्प” हा पीडित महिलांचं माहेरघर बनलाय. ‘मनस्विनी महिला प्रकल्पाच्या’ प्रमुख अरुंधती पाटील गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यात महिलांसाठी कार्यरत आहेत. बालविवाह रोखनं, महिलांवरील अत्याचार रोखणं, कौटुंबिक कलह तसेच हुंडाप्रथेला आळा घालणं, महिलांचं समुपदेशन करणं इत्यादी कामं या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या करत आहेत.
बीड मधील ही संस्था निराधार महिलांना नवीन जीवन देतेय! Beed | Manavlok | Baimanus
संबंधित लेख