21 व्या शतकात आपण विकासकामांसाठी प्रचंड प्रमाणात औद्योगिकरणाकडे वळलो आहोत. मोठमोठ्या कंपन्या, त्यांचं सांडपाणी, विषारी वायू इत्यादींमुळे होणारं जीवघेणं प्रदूषण आपल्या सवयीचं झालंय. याच प्रदूषणाचा फटका बसलेलं एक शहर म्हणजे बीड जिल्यातील परळी वैजिनाथ. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे वैद्यनाथांचे मंदिर, राजकीय उलथापालथीमुळे हे ठिकाण नेहमीच चर्चेत असतं. मात्र 12 महिने 24 तास राजकीय धुळवडीत व्यस्त असलेल्या परळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा जीव हा नेहमी गुदमरलेलाच असतो आणि याला कारण आहे 50 वर्षांपासून येथे असणारे परळी औष्णिक विद्युत केंद्र. पण याच औष्णिक विद्युत केंद्रामुळे येथील नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलंय. थर्मल पॉवर स्टेशनमधून रोज निघणारी हजारो टनांची राख स्थानिकांना गंभीर आजारांच्या दरीत ढकलत आहे.
Parali Pollution : परळीकरांच्या पोटात जेवण कमी आणि राख जास्त जातेय ! Beed | Baimanus
संबंधित लेख