इथे चक्क भाड्यावर बायको मिळते !

मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात काही रुपयांमध्ये बायको भाड्याने मिळते. एक महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत महिला भाड्याने दिल्या जातात. मध्यप्रदेशच्या शिवपूर भागात ‘धडीचा’ नावाची प्रथा आहे.

  • टीम बाईमाणूस

प्रत्येक समूहाची स्वत:ची एक स्वतंत्र मानसिकता असते. त्याप्रमाणे वागण्याची त्याची तर्‍हा निश्चित होत जात असते. यात ‘समूह’ या शब्दाला वेगळ्याने अर्थ आहे. त्याचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. यात समूहातील कुणीही समूहाच्या मर्जीविरुद्ध वागणे अपेक्षित नसते. तो द्रोह ठरतो. मनाला पटो वा न पटो, त्यानुरूप वागणे, एवढाच पर्याय समूहातील सदस्यांपुढे उपलब्ध असतो. मग ती कुप्रथा असली तरी अन्‌ ती समाजाकरता घातक असली, तरी प्रत्येकाने त्याची री ओढत जायची. अशीच एक प्रथा म्हणजे महिलांना पत्नी म्हणून भाड्याने देणे.

आपला देश महासत्ता होणार असल्याचे चित्र आपल्यासमोर नेहमीच उभे केले जाते.मध्य प्रदेशमध्ये महिला भाड्याने दिल्या किंवा घेतल्या जात असल्याचं समोर आलं आहे. अवघ्या काही रुपयांमध्ये महिलांची खरेदी-विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारावरुन भारत खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? हे पुन्हा एकदा तपासून घ्यायला हवे.

‘धडीचा’ नावाची प्रथा

मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात काही रुपयांमध्ये बायको भाड्याने मिळते. एक महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत महिला भाड्याने दिल्या जातात. मध्यप्रदेशच्या शिवपूर भागात ‘धडीचा’ नावाची प्रथा आहे. परिसरातील श्रीमंत पुरूष या प्रथेचा गैरफायदा घेतात. अवघ्या काही हजार रूपयांमध्ये येथील धनवान पुरूष महिलांची काही दिवसांसाठी खरेदी करतात. हा सर्व व्यवहार सदर लोक 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करतात. जितक्या वेळासाठी महिला भाड्याने घेतली आहे, तो कालावधी संपत आल्यानंतर व्यवहाराचे पुन्हा नुतनीकरण करुन घेता येते. या प्रथेचा बाजार भरतो. त्यामध्ये महिला बाजारात उभ्या असतात. धनाढ्य लोक बाजारात जाऊन महिलांची निवड करतात. ही प्रथा गुजरातमध्येदेखील आहे.

खरंच…! हे ऐकल्यानंतर विश्वास ठेवणे अवघड जाईल परंतु हे सत्य आहे. या संपूर्ण काळ्या धंद्यामगे एक प्राचीन प्रथा आहे. मुलींच्या खरेदी-विक्रीचा हा काळा धंदा येथे अनेक वर्षांपासून सुरु आहे. ही प्रथा ‘धडीचा’ नावाने ओळखला जातो. ‘धडीचा’ येथील एक प्राचीन प्रथा आहे. सरकारच्या खूप प्रयत्नानंतरही ही प्रथा अजूनही संपुष्टात आलेली नाही. येथील स्थानिक लोक ‘धडीचा’ प्रथेच्या नावाखाली अनेक वर्षांपासून मुलींचा सौदा करत आहेत. मुलगी विकत घेण्यासाठी चक्क स्टँप पेपरवर काँट्रॅक्ट करून स्वाक्षरी घेतली जाते. हे कॉन्ट्रॅक्ट एक रात्रीचे असते. परंतु तुम्ही जास्त पैसे दिले तर आणखी जास्त काळासाठी कॉन्ट्रॅक्ट वाढवले जाते. एका पुरुषासोबत कॉन्ट्रॅक्ट संपले की मुलीला दुसऱ्या पुरुषासाठी तयार केले जाते.

8 ते 30 हजार रुपयांना विक्री

दोन वर्षांपूर्वी इंदूरमधील एका इसमाने एका लग्न समारंभात त्याच्या बायकोला 30 हजार रुपयांमध्ये विकले होते. विकल्यानंतर अनेक दिवस त्या महिलेवर शारिरीक अत्याचार केले. ज्या इसमाने महिलेची खरेदी केली होती, त्यानेच काही दिवसांनी सदर महिलेची पुन्हा एकदा विक्री केली. मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील एका धनाढ्य व्यक्तीने त्या महिलेची खरेदी केली. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. सुटकेनंतर तिने शिवपुरी पोलीस ठाणे गाठले. महिलेने तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली. याआधी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. 2006 साली देखील गुजरातमधील एका इसमाने त्याच्या पत्नीची 8000 रूपयांना विक्री केली होती.

‘धडीचा’ नावाने ओळखली जाणारी ही प्रथा आज मात्र बऱ्याच अंशी थांबली आहे. याचे कारण म्हणजे पोलीस आणि प्रशासनाची याबाबतीत असलेली जागरुकता. इतर माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या नुसार धडीचा प्रथा या भागात व्हायची जरूर मात्र आता ती थांबली आहे. किंवा जरी होत असली तरी पोलिसांना आणि प्रशासनाला कळणार नाही अशा पद्धतीने होत असावी.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here