- टीम बाईमाणूस
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून सर्वदूर ज्ञात असलेले मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके… 1913 साली दादासाहेबांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. दादासाहेबांनी एकूण 26 लघुपटांची आणि 95 चित्रपटांची निर्मिती केली. भारतातील अभिनेत्यांना त्यांनी चित्रपटांमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वात महत्वाचा पुरस्कार दिला जातो. आज 19 फेब्रुवारी म्हणजेच दादासाहेबांनी फाळके यांचा स्मृतिदिन… त्यानिमित्त त्यांना बाईमाणूस तर्फे विनम्र अभिवादन…











