५३ गावांच्या सरपंचानी टाकला नक्षलवाद्यांवर बहिष्कार…

टीम बाईमाणूस:- गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावातील सरपंचानी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये पारित करून सरकारला पाठविला आहे. गोंदिया जिल्ह्यात ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहे. सन २००५ पासून पोलिसांनी या सर्व गावातील जनता भयमुक्त राहावी यासाठी आदिवासी जनतेच्या मनात आपल्या विषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरु केले आहे.

नक्षली चळवळीला मोडून काढायचे असेल तर ते गावकऱ्यांच्या मदतीशिवाय शक्य नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांना सहकार्य न करण्याबाबतची जनजागृती करण्यात पोलिसांना आणि तंटामुक्त गाव समित्यांना यश येत आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांना गावबंदी करणाऱ्या गावांची संख्या ५३ झाली आहे. आणखी ६१ गावांत अशा पद्धतीची बंदी करण्याचे लक्ष्य पोलिसांनी ठेवले आहे. जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त गावांपैकी ५३ गावातील ग्रामपंचायतींनी नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना कुठलेही सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये पारित करून तो शासनाला पाठवला आहे. जिल्ह्यामध्ये ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहेत. या गावातील जनता भयमुक्त राहावी यासाठी २००५ पासून पोलीस यंत्रणा आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरु केले. आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला. व्यायामशाळा उघडल्या, पोलीस भरतीपूर्व प्रक्षिशण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना वृद्धांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवूंन दिला. सुरवातीला आदिवासी नागरिक पोलिसांनी सहकार्य करीत नव्हते, पण या सर्व सोईसुविधा देण्यात आल्यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये सकारत्मक भावना निर्माण झाली आणि ते पोलिसांना सहकार्य करू लागले. त्यातच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने पोलिसांच्या कार्याला बळ मिळाले. गावागावातील तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. आदिवासी जनतेच्या मनात कायमचे घर करण्याचे काम पोलिसांनी केले.

सॅन २००५ पासून आजपर्यंत केलेल्या अविरत मेहनीतीमुळे जिल्ह्यातील ११४ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून, विकासात्मक कार्याकडे पाऊल उचलले आहे.

प्रत्येक गावाला तीन लाख रुपयाचे अनुदान

ज्या गावांनी नक्षल गावबंदी केली, अशा प्रत्येक गावाला तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ४८ गावांना एक कोटी ४४ लाख देण्यात आले आहेत. या योजनेतून मिळालेला निधी गावाच्या विकासावर खर्च करण्यात येतो, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

तंटामुक्त मोहीम ठरली दुवा

पूर्वी गावकरी पोलिसांना सहकार्य करीत नसल्यामुळे नक्षलवाद्यांना कारवायांत वाढ झाली होती, परंतु महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना जनतेपासून दूर जाण्यास बाध्य करण्यात आले. तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. परिणामी, आदिवासी जनतेने समन्वय घडवून आणण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने केले. हि मोहीम पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुवा म्हणून पुढे आली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here