वाराणसीच्या विधवांचा अनुशेष

अनुवाद : राजश्री शिलारे

वाराणसी हे आता मोठ्या वेगाने बदलणारे शहर बनले आहे. 10, 15 वर्षापूर्वी हे शहर जसे होते तसे आता ते राहिले नाही. खाड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचे नशिब आता बदलत आहे. नदीचे घाट आणि वाराणसीच्या गल्ल्यांचे रुपडे पालटले आहे. रस्त्यावर सगळीकडे दिसणारी भटकी जनावरे कमी झाली आहेत. पण एक गोष्ट मात्र अजूनही बदलेली नाही आणि ती म्हणजे वाराणसीच्या विधवांचे नशीब….

मुख्यत: मोक्ष प्राप्तीसाठी वाराणसीमध्ये आलेल्या या विधवाचे आयुष्य अतिशय खडतर आहे, काही विधवा या अतिशय मजबूर परिस्थितीत जगत आहेत. तर काही वृध्द विधवांना त्यांच्या मुलाबाळांनी चक्क भिक मागायला लावली आहे. वाराणसीमध्ये रोज नदीच्या घाटांवर संथ वाहणाऱ्या गंगेला आपल्या निस्तेज डोळ्यांनी न्याहाळणाऱ्या विधवा आढळून येतात. काशीमध्ये मोक्ष प्राप्तीची वाट पाहत वर्षानुवर्षे संघर्षमय जीवन व्यतित करणाऱ्या विधवांच्या गोष्टी वेदनादायक आहेत. इतर दिवसांसारखाच 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा केला जातो.

विधवांची संख्या 35000 हून जास्त

वाराणसी राहणाऱ्या प्रत्येक विधवेची एकचं गोष्ट आहे. कधीकाळी त्यांचेही भलेमोठे घर असायचे पण पतीच्या निधनानंतर म्हातारपणी याच विधवांना त्याच मोठमोठ्या घरांमध्ये राहण्यासाठी एक खोली देखील न दिली गेल्यांने या महिलांना वाराणसीमध्ये सोडले जाते. काही विधवांना मुक्तीची लालसा आहे तर विधवांना तक्रारींचा ढिगारा. भिक मागून खाणे आणि दुसऱ्यांच्या उपकारावर जगणे हेचं त्यांचे नशीब. वाराणसीतल्या दुर्गाकूंड येथे असणारे राजकीय वृद्धाश्रम, भगतुआ आश्रम, राज्य महिला निगमचे वृद्धाश्रम, मदर टेरिसा आश्रम, बिरला आश्रम, माँ सर्वेश्वरी वृद्धाश्रम, मुमुक्षु भवन या वृध्दाश्रमात शेकडो विधवा राहतात. काहीच्या घरच्यांनी तर त्यांना त्रास दिला म्हणून तर काही विधवांचा विश्वासघात झाल्याने या महिला येथे येऊन पोहचल्या आहेत.

विधवेची गोष्ट म्हणजे वेदना

रायबरेलीच्या सोमवती गिरी यांचे वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी लग्न लावून देण्यात आले. तिचा नवरा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याने सगळे विकून खाल्ले आणि देहरादूनमध्ये तिचा मृत्यू झाला. सोमवतीचे वडील मठात राहत असत. त्यांनीच तिला वाराणसी आणून सोडले. आता सोमवतीला आपले उर्वरीत आयुष्य एकटीने जागवे लागेल. जी कहाणी सोमवतीची तीच कहाणी इंद्रजीत कौर यांची भारताच्या फाळणीनंतर वाराणसीत आलेल्या इंद्रजीतला एका कुटुंबाने आसरा दिला पण त्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याने नशीबाने तिला ही वृद्धाश्रमात आणून सोडले. बिहारमध्ये जन्मलेल्या शांति देवीना तर आपले मूळ गावही आठवत नाही त्या 17 वर्षांपूर्वी वाराणसीच्या वृद्धाश्रमात रहायला आल्या. इतर सगळ्या विधवांची गोष्टसुध्दा अशीच मार्मिक आहे.

सरकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही

2015 साली वाराणसीच्या विधवांनी पहिल्यांदा होळी खेळली. याच वर्षी पहिल्यांदा दिवाळीनिमीत्त विधवांच्या आश्रमाबाहेर दिवे प्रज्वलित करण्यात आले. या सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगन्यावरुन करण्यात आले. 2018 मध्ये मोदी सरकारने एक हजार विधवांसाठी आश्रम बांधण्याची घोषणा केली होती पण, त्याचे नंतर काहीही झाले नाही. याच प्रकारे वेगवेगळ्या घोषणा केल्या जातील पण याहीवर्षी ठोस काहीही होणार नाही. आजचा विधवा दिवससुद्धा निघून जाईल पण विधवांचे नशीब मात्र कधीही बदलणार नाही.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here