भारतीय मुलींची ‘उडान’…

जगात सर्वाधिक महिला पायलट भारतात

  • टीम बाईमाणूस

महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत भारताने एक अनोखी कामगिरी केली आहे. संसदेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, भारतात महिला वैमानिकांची संख्या एकूण संख्येच्या 15 टक्क्यांहून अधिक आहे. जगातील इतर सर्व देशांमध्ये केवळ पाच टक्के महिला पायलट आहेत.महिला सशक्तीकरणाच्या आणखी एका क्षेत्रात भारताने जगाला मागे टाकले आहे. जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. इतर देशांमध्ये केवळ 5 टक्केच महिला वैमानिक असल्याचे सिंधिया म्हणाले.

भारतीय महिलेने चूल-मूल यांच्या पलिकडे जात आकाशाला गवसणी घातली आहे असे आपण अनेकदा म्हणतो. महिला घराबाहेर पडली, कमावती झाली, आपले कर्तृत्व सिद्ध करु लागली हे सगळे तर खरे आहेच पण विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश अशा पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपले आगळेवेगळे स्थआन निर्माण केले आहे. कधी गावातील एखादी महिला बस ड्रायव्हार होते तर कधी तीच पेट्रोल पंपावर हिमतीने उभी राहते. फायटर पालयट म्हणून कामगिरी करणाऱ्या सैन्यातील तरुणींची आपल्याला ओळख आहेच इतकंच नाही तर पायलट म्हणून काम करणाऱ्या भारतीय महिलांची संख्या जगात सर्वाधिक असल्याचे एका अहवालावरुन नुकतेच समोर आले आहे. भारताच्या आणि महिलांच्या दृष्टीने ही खरंच अभिमानास्पद आणि मान उंचावणारी गोष्ट आहे.

इतर देशात केवळ 5% महिला पायलट भारतात 15%

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, गेल्या 20-25 वर्षांत विमान वाहतूक उद्योगात बरेच बदल झाले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. महिला सक्षमीकरणाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, इतर सर्व देशांमध्ये केवळ 5 टक्केचं महिला पायलट आहेत. परंतू, भारतात हे प्रमाण 15 टक्के आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत लोकांनी ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि त्यांना अनेक प्रश्न देखील विचारले.

पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्येच विमानतळ होते. आज ते चित्र पूर्णपणे बदलले आहे. यामुळेच नागरी विमान वाहतूक उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक बनला असल्याचे सिंधिया म्हणाले. 2022-23 साठी नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीला उत्तर देताना, सिंधिया सभागृहात बोलत होते. कोरोनाच्या संकटादरम्यान, भारतानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रगती केली आहे.

नाशवंत खाद्यपदार्थांसाठी मालवाहू उड्डाणे येत्या काही वर्षांत 30 टक्क्यांपर्यंत वाढवून 133 नवीन उड्डाणे केली जातील असेह सिंधिया म्हणाले. येत्या काही दिवसांत पायलट परवाना नवीन तंत्रज्ञानाने सुलभ केला जाईल. अधिक नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि ड्रोन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वैमानिकांसाठी 33 नवीन देशांतर्गत कार्गो टर्मिनल आणि 15 नवीन फ्लाइट ट्रेनिंग स्कूल तयार करण्याची सरकारची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण भारतीय महिला असंख्य प्रवाशांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सुखरुपपणे पोहचवण्याचे काम करतात ही आनंदाची बाब आहे. इतकेच नाही तर रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा कोरोनासारखी महामारी अशा संकटप्रसंगीही भारतीय महिला वैमानिकांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत असल्याचे माध्यमांतून आपल्या समोर आले आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो आम्ही मागे नाही हेच महिला दिवसेंदिवस सिद्ध करत आहेत. आताच्या अहवालात भारतानंतर आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, अमेरिका आणि इंग्लंडचा क्रमांक लागतो.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here