“हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत, भगवान शंकरही शूद्रच’’

जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांच्या विधानामुळे नवा वाद

  • टीम बाईमाणूस

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी चर्चा आहे ती विद्यार्थ्यांमुळे नव्हे तर थेट जेएनयूच्या कुलगुरू यांनी केलेल्या एका विधानामुळे… “हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत. भगवान शंकरदेखील अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच शूद्र असू शकतात. मानवजातीच्या विज्ञानानुसार देव उच्च जातीचे नाहीत” असे विधान जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी केल्यामुळे हमखास आता देशभर याप्रककरणी वाद निर्माण होणार आहेत.

जेएनयू तिथे होणाऱ्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावेळी कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी केलेल्या एका विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. शांतीश्री धुलीपुडी यांनी हिंदू देव-देवतांबाबत आपले विचार मांडलेत. “हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत. भगवान शंकरदेखील अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच शूद्र असू शकतात. मानवजातीच्या विज्ञानानुसार देव उच्च जातीचे नाहीत”, असे त्या म्हणाल्या आहेत. देशात सध्या सुरु असलेल्या धार्मिक तेढ आणि हिंसाचाराबाबत त्यांनी आपले मत मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ‘आंबेडकरांचे लैंगिक न्यायाबद्दलचे विचार: समान नागरी संहिता डीकोडिंग’ या विषयावर व्याख्यान देताना कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी हे विधान केले. शिवाय “मनुस्मृतीत महिलांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पतीकडून जात मिळते. हे प्रतिगामी असण्याचं लक्षण आहे”, असेही त्या म्हणाल्या आहेत.

अनेकांना मानवजातीच्या विज्ञानानुसार आपल्या देवांची उत्पत्ती माहित असावी. कोणताही देव ब्राह्मण नसतो, सर्वोच्च क्षत्रिय असतो. भगवान शंकर स्मशानभूमीत बसल्यामुळे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असावेत. शंकराच्या गळ्यात साप असतो. अंगावर कपडेही कमी कपडे असतात, असेही शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या आहेत. मानवजातीच्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी, शक्ती अगदी भगवान जगन्नाथही उच्च जातीतून आलेले नाहीत. भगवान जगन्नाथ हे खरे तर आदिवासी वंशाचे आहेत. मग आजही आपण हा भेदभाव का सुरू ठेवतोय जो अत्यंत अमानवी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे फार महत्वाचे आहेत.आधुनिक भारतामध्ये इतका महान विचारवंत कोणीही नाही. आपल्या समाजातील उपजत, संरचित भेदभावावर आपल्याला जागृत करणारे गौतम बुद्ध हे पहिले होते, असे म्हणत त्यांनी हिंदू धर्म हा धर्म नाही, ती जीवनपद्धती आहे, असेही विधान केले आहे.

शांतीश्री धुलीपुडी कोण आहेत?

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झालेल्या शांतीश्री धुलीपुडी पंडित या पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. 1988 पासून त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. तर, त्या 1985 पासून संशोधन करत आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेलोशिप देखील मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी गोवा विद्यापीठात देखील काम केलं आहे. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी विविध समित्यांवर काम केलं आहे. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 23 विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. तर, विद्यार्थ्यांनी एम.फिल. केलं आहे. शांतिश्री या जेएनयूची माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी 1986 मध्ये एमफिल आणि 1990 मध्ये पीएचडी मिळवली. यापूर्वी त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातही अध्यापन केले आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here