हमीदा बानोची ही कहाणी नक्की वाचा!

टीम बाईमाणूस

भारत आणि पाकिस्तान सीमेवर कितीही काटेरी कुंपण लावले असले आणि कितीही बंदुकधारी जवान तैनात असले तरी सोशल मीडियाने ही सरहद केव्हाच ओलांडली आहे. बेकायदेशीर घुसखोरी किंवा घुसखोरी करून विघातक कृत्य करण्यासाठी ही सरहद सोशल मीडियाने ओलांडली नसून या दोन देशांमधील कटुता कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून ही सरहद पार केली आहे. अलिकडच्या काळात सोशल मीडियाच्या मध्यस्तीमुळे अशा दोन सकारात्मक घटना घडल्या आहेत ज्या वाचून आपल्याला एक सुखद धक्का बसेल. गेल्या महिन्यात सोशल मीडियामुळे पुण्याच्या 90 वर्षांच्या आजीबाईंना पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील त्यांच्या पूर्वजांच्या घराला भेट देता आली तर दोनच दिवसांपूर्वी याच सोशल मीडियामुळे 20 वर्षांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेली एक महिला थेट पाकिस्तानात सापडली आहे.

हमीदा बानोची कहाणी…

हमीदा बानो या 20 वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी शोध घेऊनही त्यांचा शोध काही लागला नाही. असे असतांना अचानक एके दिवशी हमदा सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओमध्ये दिसली आणि ती पाकिस्तानमध्ये असल्याचे समजले. दुबईमध्ये स्वयंपाकिणीची नोकरी मिळवून देतो असे म्हणत एका रिक्रूटमेंट एजेंटने 2002 मध्ये हमीदा बानोला भारत सोडायला लावले. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करून तिला पाकिस्तानात नेण्यात आल्याचे हमीदा सांगतात. हमीदा यांचे कुटुंब मुंबईत राहते. एका मुलाखतीत त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते हमीदाला गेल्या 20 वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे, पैसे आणि स्थानिक माहिती नसल्याने हमीदालाही भारतात येता आले नाही. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही. पण तरीही त्यांनी आपल्या मुलांना भेटण्याची आशा सोडली नाही.

दुबई सांगून पाकिस्तानला नेले

महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील एक सामाजिक कार्यकर्ता वलीउल्लाह मारूफ यांनी एकदा हमीदाची भेट घेतली. यावेळी हमीदाने सांगितले की, मुंबईतील एका एजंटने 20 वर्षांपूर्वी दुबईमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन तिची फसवणूक केली आणि तिला शेजारच्या देशात पाकिस्तानात आणले. बानो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक प्रमुख शहर हैदराबाद येथे राहत होती. तेथे तिने एका स्थानिक पुरुषाशी लग्न केले, ज्याच्यापासून तिला एक मूल आहे. मात्र नंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला.

पाकिस्तानचा मारूफमुळे लागला शोध

महिलेची कहाणी ऐकून आणि घरी परत जाण्याची तळमळ पाहून मारूफने बानोचा एक व्हिडिओ त्याच्या YouTube चॅनेलवर अपलोड केला. त्यानंतर त्याला मदत करू शकेल अशा मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्याचा शोध घेतला आणि शेवटी त्याला खफलान शेख नावाचा सामजिक कार्यकर्ता सापडला. त्यानंतर शेखने हा व्हिडिओ त्याच्या स्थानिक ग्रुपमध्ये प्रसारित केला आणि कुर्ल्यातील कसाईवाडा परिसरात राहणाऱ्या बानोची मुलगी यास्मिन बशीर शेख हिचा शोध घेतला. आपली आई 2002 मध्ये एका एजंटमार्फत घरकाम करण्यासाठी दुबईला गेली. मात्र, एजंटच्या निष्काळजीपणामुळे ती पाकिस्तानात पोहोचली. आम्हाला तिचा ठावठिकाणा माहित नव्हता आणि त्याच एजंटद्वारे फक्त एकदाच तिच्याशी संपर्क साधता आला, अशी माहिती बानो यांची मुलगी यास्मिनने सांगितली.

या इमोशनल व्हिडीओ कॉलवर यास्मिन शेख आपल्या आईला विचारते, “कशी आहेस? तू मला ओळखलंस का? इतक्या वर्षात तू कुठे होतीस?” यावर हमीदा बानो म्हणतात, “मला विचारू नकोस मी कुठं आहे? मी हे सगळं कसं सहन केलं? मला तुमची खूप आठवण येते. मी माझ्या इच्छेने इथं राहिलेले नाही, माझ्याकडे याशिवाय पर्याय नव्हता.

मारूफला दिलेल्या मुलाखतीत हमीदाने तिची संपूर्ण कहाणी सांगितली. पतीच्या निधनानंतर ती एकटीच मुलांचा सांभाळ करत असल्याचे तिने सांगितले. त्यांनी दोहा, कतार, दुबई आणि सौदी अरेबियामध्ये स्वयंपाकी म्हणूनही काम केले. हमीदा सांगते की 2002 मध्ये तिने दुबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी एका रिक्रूटमेंट एजंटशी संपर्क साधला होता, त्यासाठी त्या एजंटने हमीदाकडून 20 हजार रुपये घेतले होते. बानो म्हणाल्या की, एजंटने तिला दुबईला आणण्याऐवजी पाकिस्तानातील हैदराबाद शहरात आणले होते, जिथे त्यांना तीन महिने बंदिस्त ठेवण्यात आले.

तिने सांगितले की, जेव्हा ती कैदेतून सुटली तेव्हा तिने कराचीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न केले. सध्या हमीदा तिच्या सावत्र मुलासोबत राहते. त्याचवेळी हमीदा यांची मुलगी यास्मिन हिने सांगितले की, तिने एजंटच्या माध्यमातून तिच्या आईला शोधण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तिची आई आता तिच्याशी बोलू इच्छित नाही आणि काही वेळाने तो एजंटही गायब झाल्याचे तिने सांगितले.

मारूफने सांगितले की, तो हमीदाला लहानपणापासून पाहत आहे. ती त्यांच्या कॉलनीत दुकान चालवायची. हमीदाची कहाणी ऐकून आपण भावूक झालो, पण दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे तो संकोच झाल्याचे त्याने सांगितले. याशिवाय त्याच्या मित्रांनीही त्याला भारतापासून दूर राहण्यास सांगितले. पण त्याची अवस्था पाहून इतकं वाईट वाटलं की मी स्वतःला थांबवू शकले नाही.

याआधीही बानो कतारला घरकामासाठी गेल्या होत्या. “आम्हाला आनंद आहे की, आमची आई जिवंत आणि सुरक्षित आहे. आता आम्हाला तिला परत आणण्यासाठी भारत सरकारने मदत करावी अशी आमची इच्छा आहे,” असे यास्मिन पुढे म्हणाली. बानो यांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी कुटुंबाने पाकिस्तान उच्चायुक्तांकडे संपर्क साधला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here