… तर जीवाला मुकशील!

अभिनेत्री स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी

टीम बाईमाणूस / 1 जुलै 2022

बॉलीवूडच्या (Bollywood) कलाकारांना मिळणाक्या धमक्यांचे सत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये. सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना ठार मारण्याच्या धमकीच्या पत्राचे प्रकरण ताजे असतानाच आता चतुरस्त्र अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला ठार मारण्याचे धमकीचे पत्र मिळाले आहे. स्वराला तिच्या राहत्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले असून त्यात अत्यंत हीन भाषेत, अपशब्द वापरून धमकी देण्यात आली आहे. सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, तसेच त्यांच्याबद्दल काही बोललीस तर जीवाला मुकशील, असे पत्रात म्हटले आहे.

हे पत्र नवी दिल्ली येथून पाठविण्यात आले आहे. या पत्रात थेट स्वराची हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. सावरकरांचा अपमान करणे थांबव आणि फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रीत कर, नाहीतर अंतिम संस्कार होतील, असे या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्वरा भास्कर नेहमीच राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते.. ती नेहमीच राजकीय-सामाजिक विषयावर तिखट प्रतिक्रिया देत व्यक्त होताना दिसते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलही व्हावं लागलं आहे. पण मागे हटेल ती स्वरा कुठली. तिचं या-ना त्या कारणावरुन टोकाची विधानं करणं सुरू असतं, ”सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, सुटकेसाठी याचना केली, त्यामुळे ते ‘वीर’ पदवीच्या पात्रतेचे ठरत नाहीत…” अशी पोस्ट तिनं 2017 मध्ये केली होती. या पोस्टवरनं स्वराला सगळ्यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.

स्वरानं नुकतीच उदयपुर हत्याकांड (Udaipur Murder Case) प्रकरणावरही पोस्ट केली आहे. तिनं या पोस्टच्या माध्यमातून कन्हैय्यालालच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे,”ही घटना निंदनीय आहे. मारेकऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. हा मोठा गुन्हा आहे. जसं नेहमी बोललं जातं की,जेव्हा तुम्ही तुमच्या देवाच्या नावावर हत्या करता तेव्हा तुमच्यापासून सुरुवात करा,दुर्बळ राक्षस कुठले”.

हे ही वाचा 👉🏽 कसे आणि कोण आवरणार या धर्मांध लोकांना?

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here