विम्बल्डन स्पर्धेत सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला

'लीला राव दयाल' यांची ही गोष्ट भारतातील उदयोन्मुख टेनिस खेळाडूंना नेहमी प्रेरणा देत राहील

  • टीम बाईमाणूस

लीला राव दयाल (Leela Row Dayal) या भारतातील एक लेखिका आणि महिला टेनिसपटू होत्या. 1934 मध्ये, त्यांनी विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये (Wimbledon) सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनून इतिहास रचला. प्रसिद्ध संस्कृत कवयित्री पंडिता क्षमा राव आणि राघवेंद्र राव यांच्या पोटी लीला राव दयाल यांचा जन्म झाला.

त्यांनी विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता, ही अत्यंत जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा मानली जाते. दयाल यांनी 1934 च्या विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. ही स्पर्धा विम्बल्डन, लंडनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली होती. 25 जून 1934 ते 7 जुलै 1934 दरम्यान या 54व्या विम्बल्डन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इंग्लंडच्या ग्लॅडिस साउथवेलचा पराभव करून विम्बल्डनमध्ये सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेल्या होत्या लीला राव दयाल. पुढील सामन्यात, दयालने फ्रान्सच्या इडा ॲडमॉफचा सामना केला आणि त्या पराभूत झाल्या. दयालने 1935 च्या विम्बल्डनमध्येही भाग घेतला होता परंतु पहिल्याच फेरीत एव्हलिन डिअरमनकडून पराभव पत्करून त्या स्पर्धेबाहेर फेकल्या गेल्या.

दयाल यांनी इंडियन ओपन (टेनिस) मध्ये देखील भाग घेतला, ज्याला पूर्वी ऑल इंडिया चॅम्पियनशिप म्हणून ओळखले जात असे. दयाल यांनी इंडियन ओपनमध्ये सात एकेरीचे विजेतेपद जिंकले आणि तीन इंडियन ओपनमध्ये त्या उपविजेता ठरल्या होत्या. 1931 इंडियन ओपनमध्ये लीला राव दयाल यांनी लीना मॅकेन्ना विरुद्ध पहिल्यांदा इंडियन ओपन जिंकली. त्यानंतर त्यांनी 1936, 1937 आणि 1938 मध्ये सलग तीन वर्षे इंडियन ओपनचे विजेतेपद पटकावले. त्यावेळी त्यांनी अनुक्रमे रोसिया गिब्सन, जोन फ्राय लेकमन आणि मेहेर दुबाश यांचा पराभव केला. त्यानंतर दयाल यांनी 1940 मध्ये लॉरा वुडब्रिज विरुद्ध इंडियन ओपन स्पर्धा जिंकली आणि पुढील वर्षी 1941 मध्ये मेहेर दुबाश विरुद्ध जिंकून याच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी 1943 मध्ये मेहेर दुबाश विरुद्ध त्यांचे शेवटचे इंडियन ओपन जिंकले.

दयाल तीन इंडियन ओपन स्पर्धांमध्ये उपविजेती ठरल्या होत्या. 1931 आणि 1932 मध्ये ती जेनी सँडिसनकडून त्यांना हार पत्करावी लागली. 1942 मध्ये त्या मिसेस मॅसी यांच्याविरुद्ध हरल्या. लीला राव दयाल या लेखिकासुद्धा होत्या आणि त्यांनी प्राचीन आणि आधुनिक शास्त्रीय भारतीय नृत्याबद्दल अनेक पुस्तके लिहिली. त्यांची पुस्तके इंग्रजी आणि संस्कृतमध्ये लिहिली गेली. 1958 मध्ये तिने ‘नाट्य चंद्रिका‘ नावाच्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारावरील हस्तलिखित अभ्यास त्यांनी प्रकाशित केला. स्वातंत्र्यानंतर अमेरिका आणि भारतामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या हरीश्वर दयाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि 1964 मध्ये माउंट एव्हरेस्टच्या सहलीवर असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा 👉🏼 ऐश्वर्या जाधवने गाठले पन्हाळ्यावरून थेट विम्बल्डन

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here