अग्निपथ योजनेमध्ये महिलांना संधी

नौदलात होणार भरती

टीम बाईमाणूस / 2 जुलै 2022

वास्तविक तरुणींमध्ये सैन्यात भरती होण्याची इच्छा आजकाल प्रबळ होताना दिसते आहे. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्यावर हा प्रभाव पडताना दिसतो. ‘नॅशनल कॅडेट कॉप’ म्हणजेच NCC आणि नॅशनल सव्‍‌र्हिस स्कीम म्हणजेच NSS या दोन विभागांत त्यांचा सहभाग वाढला आहे. धाडसी देशसेवेची ओढ ही इथेच लागते, त्याची बीजे इथे रुजतात. तिन्ही संरक्षण दलांमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात, मात्र महिला लढाई विभागात क्वचितच पाहायला मिळतात. ‘अग्निपथ’ (Agnipath) योजनासुद्धा याला अपवाद नाही. या योजनेच्या माध्यमातून तरी आपल्याला सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची संधी मिळेल का? असा प्रश्न सध्या तरुणींसमोर आहे.

नौदलात महिला खलाशींची प्रथमच अग्निपथ योजनेत या वर्षी भरती केली जाणार आहे. यौद्धनौकांवर त्यांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा तीन हजार महिलांची नौदल (Indian Navy) अग्निवीर म्हणून भरती केली जाईल. पहिली तुकडी ही 10-20 टक्क्यांची राहिल. त्यांचे प्रशिक्षण ओडिशातील (Odisha) आयएनएस चिल्का (INS Chilka) येथील आस्थापनेत 21 नोव्हेंबरपासून सुरु होईल. (Navy Will Recruit Women Under Agnipath Scheme)

नौदलात अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) भेदभाव नसेल. जसे आम्ही बोललो, 30 महिला अधिकारी या सध्या युद्धनौकांवर तैनात आहेत. आम्ही ठरवले आहे, आता वेळ आली की महिला खलाशींची भरती करणे, सर्व विभागात महिला असतील, असे व्हाईस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी (Dinesh K. Tripathi) रविवारी म्हणाले. 14 लाखांच्या लष्करी सैन्यात महिलांचा 1990 वर्षापासून समावेश होऊ लागला. मात्र 2019-20 मध्ये त्या अधिकारी होत्या. 70 हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये महिलांची संख्या केवळ 3 हजार 904 (लष्कारात 1,705, वायुदलात 1,640 आणि नौदलात 559) होती. या व्यतिरिक्त 9 हजार अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या 100 महिला जवान लष्करात (CMP) आहेत. 2019-20 मध्ये पहिल्यांदाच ‘अदर रँक्स’ (Other Ranks) अंतर्गत महिलांची भरती सुरु झाली. 199 पेक्षा अधिक सीएमपी महिलांची गेल्या दोन वर्षांमध्ये भरती करण्यात आली.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here