कधीच म्हणालो नाही, “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !

माझ्या नावावर खोट्या पोस्ट व्हायरल - हलधर नाग

कोसली भाषेतील प्रसिद्ध कवी पद्मश्री हलधर नाग यांच्याबद्दल वेळोवेळी अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या हलधर नाग यांच्याशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे नेमकी सत्यता…?

पद्मश्री पोस्टाने पाठवा’ ही हलधर नाग यांच्यावरील पोस्ट बरेच भाबडे लोक पुन्हा पुन्हा शेयर वा फॉरवर्ड करीत आहेत. ओरिसातील एक गरीब कवी हलाखीचे जीवन जगताना राम शबरीवर महाकाव्ये लिहितो, ती अभ्यासक्रमाला लागतात. या अल्पशिक्षित कविवर पाच लोक पीएचडी करताहेत. त्याच्यावर अनेक लेखक लेख लिहितात, मग पद्मश्री मिळते तर पदवी घ्यायला दिल्लीला येऊ शकत नाही पदवी पोस्टाने पाठवा असे हलधर कळवतात म्हणे. या स्टोरीमध्ये ड्रामा आहे. ॲक्शन आहे. गरीबी असल्याने टनावारी अश्रू आहेत. हरिजन वगैरे शब्द पेरून सहानुभूतीची लाट निर्माण केलेली आहे. यात ही सत्यकथा‘ आहे, ‘प्रेरणादायी‘ आहे वगैरे भलावणच सांगते की ही जाहिरातस्टोरी आहे. प्रायोजित स्टोरी आहे.

कोसली भाषेतील प्रसिद्ध कवी पद्मश्री हलधर नाग यांच्याबद्दल वेळोवेळी अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या हलधर नाग यांच्याशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पद्मश्री पुरस्कार घेण्याकरिता दिल्लीला जाण्यासाठी हलधर नाग यांच्याकडे पैसे नव्हते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाग यांनी यासंदर्भात सरकारला पत्र लिहून आपला पुरस्कार पोस्टाने पाठवावा, अशी विनंती केली होती. अशा दाव्यांसह पोस्ट यापूर्वीही व्हायरल झाल्या आहेत. आता ही पोस्ट पुन्हा व्हायरल झाल्यानंतर या मागचे सत्य जाणून घ्यायचे आहे.

“पद्मश्री” पोस्टाने पाठवा, असं कधीच म्हटंल नाही

हलधर नाग यांचा 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना 2016 मध्ये त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या गरिबीचे कारण देत सरकारला कोणतेही पत्र लिहिले नाही किंवा पद्मश्री पुरस्कार पोस्टाने पाठवण्याबाबतही बोलले नाही. हलधर नाग यांना पद्मश्री पुरस्कार देण्यापूर्वीच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्याकडून त्यांना कलाकार भत्ता दिला जात होता. ओडिशा सरकारने त्यांना राहण्यासाठी जमीनही दिली आहे, ज्यावर एका डॉक्टरने स्वखर्चाने त्यांना घरही बांधून दिले आहे. नाग यांना सरकारकडून सुमारे 18,500 रुपये मासिक भत्ताही मिळतो.

Haldhar Nag

माझ्या नावावर खोट्या पोस्ट व्हायरल करतात – हलधर नाग

सोशल मीडियावर व्हारल पोस्ट बाबत हलधर नाग यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून आपल्याला 2016 मध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आपल्याला कारने रायपूरला नेण्यात आले आणि तिथून विमानाने दिल्लीला नेल्यानंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. यादरम्यान त्यांना दिल्लीतील ओडिशा केडरच्या अधिकाऱ्यांनीही पूर्ण सहकार्य केले. सोशल मीडियावर सतत खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत. कधी पाणी-भात खाताना तर कधी हरभरा विकून दाखवून बदनामी केली जाते. कधी-कधी आपल्या आवाजाची नक्कल करून पोस्टही अपलोड केली जाते. जे चुकीचे असून अशा पोस्ट्समुळे खूप दुःखी आहे, असे व्हायरल पोस्टबाबत हलधर नाग यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ. हलधर नाग यांचा जन्म 31 मार्च 1950 ला ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील घेनस गावात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. नाग खूप लहान होते, तेव्हा त्याचे वडील वारले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना फक्त तिसरीपर्यंतच शिक्षण घेता आले. हलधर नाग यांना कविता लिहिण्याची आवड होती आणि त्यामुळे ते लवकरच देशभर प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या कवितांवर अनेकांनी पीएचडी केली आहे. नागांच्या अनेक प्रसिद्ध कलाकृतींसह संकलित ‘हलधर ग्रंथावली’चाही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश आहे.

व्हायरल झालेली खोटी पोस्ट

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत
“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !
(एक अफलातून सत्यकथा)
ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !
त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,
दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत
“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !
अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.
कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,
कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.
आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या “हलधर ग्रंथावली – भाग -2” याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.
साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .

हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !

श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर हि पोस्ट करतोय.
ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन – पेन्सिल – शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले. आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.

आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी 1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत “राम शबरी” सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला.
अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.
त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,
आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।
डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. “सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत” अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हि आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,
काहीही होवो….. रडायच नाही
तर लढायच आणि लढून जिंकायचं !

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here