नाव दीपा बारीक… पण या ट्विटर गर्लचे काम मात्र प्रचंड

टीम बाईमाणूस / 05 जुलै 2022

21 व्या शतकात जगभरात सोशल मीडियाचे (Social Media) वारे वाहत आहे. विविध सोशल मीडिया ऍप्सद्वारे दररोज करोडो लोक व्यक्त होत असतात. जगात दर सेकंदाला 6 हजारांपेक्षा अधिक लोक ट्विट (Tweet) करतात. यानुसार आपण एका वर्षात 200 अब्ज ट्विट करतो. पण, यात अर्थपूर्ण कामांसाठी किंवा लोकांना मदत करण्यासाठी किती ट्विट केले जातात? त्याचा डेटा उपलब्ध नसला तरी काही लोक डेटाची परवा न करता मूळ प्रश्न सोडवण्यासाठी सोशल मीडिया या माध्यमाचा चांगल्या उद्देशांसाठी वापर करत आहेत. 25 वर्षांच्या दीपा बारीक (@charubalaB ) ओडिशात ट्विटर क्वीन (Twitter Queen) म्हणून प्रसिद्ध आहेत.

दीपा बारीक ही मूळची ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील टेमरी गावची आहे. इथे लोक तिला ट्विटर गर्ल किंवा ट्विटर क्वीन म्हणतात. दीपा या नावाने येथे प्रसिद्ध आहे. कारण दीपा ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करते. 2019 पासून ती ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. तिने ट्विटरला लोकांचा आवाज बनवले आहे. एवढेच नाही तर दीपाने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 6 हजारांहून अधिक समस्या सोडवल्या आहेत. एकीकडे ट्विटरवर लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, तर दीपा त्यांच्या समस्या स्वतःच्या समजते आणि मदतीचा हात पुढे करते.

पुढील कथा वाचा दीपा यांच्या शब्दात…

Deepa Barik Twitter Profile

मी ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील टेंभरी गावातील आहे. वडिलांनी 2019 मध्ये एक स्मार्टफोन घेऊन दिला. त्यावेळी इंटरनेटच्या मदतीने मी खऱ्या अर्थाने जगाशी जोडले गेले असे वाटले. अनेक वर्षांपासून मी माझ्या आजूबाजूला सोशल मीडियावर सक्रियपणे काम करणाऱ्या काही लोकांना पाहत आणि ऐकत होते. 2019 मध्ये ओडिशात आलेल्या ‘फनी’ चक्रीवादळानंतर लोकांच्या समस्यांबद्दल ट्विट करायला सुरुवात केली. सरकारच्या 5-टी मॉडेलमुळे अडचणीही वेळेत सुटल्या, यातून आत्मविश्वास निर्माण झाला.

ओडिशात 5-टी अंतर्गत वेळेच्या मर्यादेत समस्या सोडवणे आवश्यक आहे. मात्र गरिबी आणि निरक्षरतेमुळे लोकांकडे फोन-इंटरनेट नसल्याने समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. मग मी राज्य सरकारचे विभाग अधिकारी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलची बँक बनवली. आजूबाजूचे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडू लागले. 10-10 वर्षांपासून अनेक मुद्दे प्रलंबित होते. मात्र ट्विट केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वर्ष 2021 ची गोष्ट. बरगढ जिल्ह्यातील उमा बरीहा यांनी फोनवर मला त्यांची व्यथा सांगितली.

पतीच्या निधनानंतर पाच लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मी संबंधित विभागाला ट्रॅक करत त्यांच्या समस्या ट्विट केल्या यानंतर मुलांना ‘आशीर्वाद योजने’ अंतर्गत महिन्याला 1500 रुपये सरकारी मदत मिळू लागली. कोविड काळात इतर राज्यात अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी मदत केली. सकाळी ओडिशाचे वर्तमानपत्र वाचून माझा दिवस सुरू होतो. महत्त्वाच्या समस्या लक्षात घेऊन मी संबंधित लोकांशी संपर्क साधते आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करते. लोक रोज घरी समस्या घेऊन येतात. फोनद्वारेही संपर्कात राहतात. ट्विटरसोबतच्या या 4 वर्षाच्या प्रवासात अनेक राजकीय सन्मानही मिळाले. मात्र, लोकांचे प्रश्न सुटतात आणि ते आशीर्वाद देतात तेव्हा खरा आदर जाणवतो.

ओडिशात आलेल्या फनी चक्रीवादळानंतर दीपाने लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. त्या काळात ती ट्विटरवर लोकांच्या समस्या सांगायची. गरिबी आणि निरक्षरतेमुळे लोकांकडे फोन आणि इंटरनेट नव्हते. त्यांना त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत दीपा त्यांच्या समस्या एक माध्यम म्हणून लिहून सरकार आणि अधिकाऱ्यांना टॅग करायची. अशा प्रकारे आजूबाजूचे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने मांड्याला सुरवात केली.

दीपा रोज सकाळी वर्तमानपत्र वाचते आणि वृत्तपत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित लोकांशी संपर्क साधून लोकांना शक्य ती मदत करते. आता तर असे आहे की लोक दीपाच्या घरी त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत आणि मदत मागत आहेत. या उदात्त कार्याबद्दल दीपाला ट्विटरच्या माध्यमातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दिपा म्हणते की, तिला खार समाधान तेव्हा वाटते जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवल्या जातात आणि त्यानंतर तिला लोक आशीर्वाद देतात, मग दिवसाची सुरुवात चांगली झाली असे वाटते.

Source : NandiGhosha TV

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here