लेखिका गीतांजली श्री यांना प्रतिष्ठेचा ‘बुकर पुरस्कार’

'Tomb of Sand' कादंबरीची पुरस्कारासाठी निवड

टीम बाईमाणूस / २७ मे २०२२

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कथाकार गीतांजली श्री यांना त्यांची कादंबरी ‘रेतसमाधी’ साठी जागतिक प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. याचा केवळ हिंदी साहित्य विश्वालाच नव्हे तर प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि आनंद वाटायला हवा.कारण बुकर सारखा साहित्यातला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळविणार्‍या गीतांजली श्री या पहिल्या हिंदीच नव्हे तर पहिल्या भारतीय तसेच
दक्षिण आशियातल्यादेखील पहिल्याच साहित्यिक ठरल्या आहेत. त्यांच्या ‘रेतसमाधी’ या कादंबरीचा ‘टाॅंब आॅफ सॅंड’ Tomb of Sand हा अनुवाद डेझी राॅकवेल यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या जगातील 13 पुस्तकांपैकी हे पुस्तक होते. हिंदी भाषेतील ही पहिलीच कादंबरी आहे जी या प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांच्या यादीत होती.

‘टॉम्ब ऑफ सँड’ हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे कोणत्याही भारतीय भाषेतील पहिलं पुस्तक ठरलं आहे. गुरुवारी (26 मे) लंडनमधील एका कार्यक्रमात, लेखिका गीतांजली श्री यांना या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला. गीतांजली श्री यांना पाच हजार पौंडची रक्कम मिळाली जी त्या डेजी रॉकवेल यांच्यासोबत शेअर करणार आहेत.

काय आहे कथा?

1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पती गमावलेल्या 80 वर्षीय विधवा महिलेची कथा या कादंबरीत आहे. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये जाते. खूप संघर्षानंतर, तिने तिच्या नैराश्यावर मात केली आणि फाळणीच्या वेळी मागे राहिलेल्या भूतकाळाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेते. राजकमल प्रकाशनाने प्रकाशित केलेलं ‘रेत समाधि’ हे पहिले हिंदी पुस्तक आहे ज्याने केवळ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीमध्ये स्थान मिळवलं नाही तर तो पुरस्कारही जिंकला.

या पुरस्कारांसाठी निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलेले अनुवादक फ्रँक वाईने म्हणाले की, “अत्यंत उत्कट चर्चेनंतर न्यायाधीशांनी ‘टॉम्ब ऑफ सँड’ या पुस्तकाला बहुमताने मत दिलं. अत्यंत क्लेशकारक घटनांचा सामना करुनही ही एक विलक्षण पुस्तक आहे.”

कोण आहेत गीतांजली श्री?

गीतांजली श्री या मूळच्या उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधल्या आहेत. गितांजली श्री यांनी तीन कादंबऱ्या आणि अनेक कथासंग्रह लिहिले आहेत. त्यांच्या साहित्याचं इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, सर्बियन आणि कोरियन भाषांमध्ये अनुवाद झालं आहेत. दिल्लीत राहणारे 64 वर्षीय लेखिका गितांजली श्री यांच्या रेत की समाधी पुस्तकाचं अनुवाद करणाऱ्या डेझी रॉकवेल या चित्रकार आणि लेखिका असून त्या अमेरिकेत राहतात. त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू साहित्याचं भाषांतर केलं आहे.

मी भारावून गेले आहे – गीतांजली श्री

मला ‘बुकर’चे कधीच स्वप्न नव्हते, पण आज या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मी भारावून गेले आहे. ‘रेत समाधी’ ही आपण राहत असलेल्या जगाची एक शोकांतिका असून भविष्यात येऊ घातलेल्या विनाशाच्या वेळी आशा टिकवून ठेवणारी कथा आहे. तसेच लिखाण हेच लेखकाचे बक्षीस असते आणि बुकर पुरस्कार एक बोनस असेही त्या पुढे म्हणाल्या. बुकरमुळे आता ही कादंबरी अधिकाधिल लोकांपर्यंत पोहचेल.

बुकर पुरस्कार काय आहे?

हा पुरस्कार दरवर्षी इंग्रजीत अनुवादित केलेल्या आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाला दिला जातो. 7 एप्रिल रोजी लंडन बुक फेअरमध्ये 2022 पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकाची घोषणा करण्यात आली होती. तर गुरुवारी (26 मे) विजेत्याची घोषणा झाली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here