कधी पायल तर कधी प्रिया…

काय आहे पाकिस्तानचे ‘प्रोजेक्ट शेरनी’ मिशन?

टीम बाईमाणूस /16 जून 2022

पाकिस्तानने ‘प्रोजेक्ट शेरनी’ या नावाने हे मिशन सुरू केले असून भारतीय लष्करातील जवानांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानने हनी ट्रॅपचे 7 मॉडेल तयार केले आहेत. पाकिस्तानमध्ये बसून आयएसआयने (ISI) भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार येथील 300 पेक्षा जास्त महिला ज्यात सेक्स वर्कर्स आणि महाविद्यालयीन तरुणींची भरणा असलेली फौज बाळगली आहे.

प्रदीप कुमार या भारतीय लष्कराच्या एका जवानाला 18 मे रोजी अटक करण्यात आली. प्रदीप कुमारवर आरोप आहे की त्याने भारताची काही कॉन्फिडेन्शियल आणि टॉप सिक्रेट माहिती पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) ला पुरवली. अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यावर असे आढळले की, हा सगळा ‘हनी ट्रॅप’चा (Honey Trapping) प्रकार होता. सर्व गोपनिय माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानी एजंट्स मादक सौंदर्य आणि सोबतच हिंदी गाणी, फिल्मी रिल्स बनवून, देवी देवतांचे फोटो वापरूनही भारतीय जवानांना जाळ्यात ओढतात आणि एकदा लष्करी अधिकारी त्या जाळ्यात अडकले की मग पुढची मोहिम सहज फत्ते होते.

अशी माहिती मिळाली आहे की पाकिस्तानने ‘प्रोजेक्ट शेरनी’ या नावाने हे मिशन सुरू केले असून भारतीय लष्करातील जवानांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानने हनी ट्रॅपचे असे 7 मॉडेल तयार केले आहेत. पाकिस्तानमध्ये बसून आयएसआयने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार येथील 300 पेक्षा जास्त महिला ज्यात सेक्स वर्कर्स आणि महाविद्यालयीन तरुणांची भरणा असलेली फौज बाळगली आहे. अशा महिलांचे भारतातील वेगवेगळ्या प्रांतात कॉल सेंटर (Call Center) सुरू करून त्यात डार्क वेब (Dark Web) आणि हनी ट्रॅपचे प्रशिक्षण देत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

Image Courtesy News 18

हनी ट्रॅपसाठी कशी होते निवड?

अर्थातच देखणं सौंदर्य हाच निकष हनी ट्रॅपसाठी वापरला जातो. जितकी सुंदर मुलगी तितकी तिला संधी मिळण्याची शक्यता जास्त. कराची आणि लाहोर या पाकिस्तानातील शहरांच्या सेक्स वर्कर्स किंवा कधीकधी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना पैशांची लालुच दाखवून त्यांना या कामासाठी तयार केले जाते. एकदा का होकार मिळाला की मग त्यांचे 180 दिवसांचे प्रशिक्षण सुरू होते ज्यात त्यांना भारतीय सैन्याबद्दलची माहिती पुरवली जाते. उदा. अधिकाऱ्यांचा हुद्दा, त्यांचे लोकेशन, त्यांच्या कामाचे स्वरूप इत्यादी… प्रशिक्षणादरम्यान मुलींना त्यांच्या खोलीत देवीदेवतांची छायाचित्रे आणि बोलताना सतत देवाचे नाव घेण्याची सवय लावली जाते.

हनी ट्रॅपची पूर्ण प्रोसेस अशी असते

सगळ्यात अगोदर भारताच्या मोबाईल नंबरवरून वॉट्सअप आयडी (WhatsApp ID) तयार करतात. भारतीय सैन्यातील अधिकारी आणि जवानांना या जाळ्यात ओढण्यासाठी अगोदर त्यांचे मित्र आणि ते जिथे राहतात तिथल्या आजूबाजूंच्या लोकांशी मैत्री करण्यात येते.

मैत्री – सोशल मीडियावर बोगस आयडी बनवून फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली जाते.

प्रेम – एकदा का रिक्वेस्ट स्वीकारली की मग सुरू होतो प्रेमाचा सिलसिला. आपले टार्गेट स्पष्ट झाल्यावर त्या मुली प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात.

लग्नाचे वचन – मैत्री आणि प्रेमाचे रुपांतर मग हळूहळू लग्नाच्या दिशेने जाते आणि लग्नाचे वचन मुलीकडूनच दिले जाते.

सेक्स चॅट / फोन सेक्स – एकदा का समोरचा लग्नासाठी तयार झाला की मग सुरू होतात सेक्स चॅट आणि फोन सेक्स. चावट आणि अश्लील गप्पा मारणाऱ्या त्या मुलीच्या गप्पा ऐकून समोरच्याला खात्री पटते की ही आता माझ्याशी लग्न करणारच.

न्यूड व्हिडियो कॉल – प्रेम आणि वासना… ही पुढची पायरी. समोरच्याला या जाळ्यात अडकवण्यासाठी मग मुलगी न्यूड कॉल करून टार्गेटचा व्हिडियो रेकॉर्ड करून ठेवते. टार्गेट तर इतका बेफाम झालेला असतो की तो त्याबदल्यात कोणतीही गोपनीय माहिती देण्यास एका पायावर तयार होतो.

ब्लॅकमेल – आतापर्यंतचे सगळे चॅट्स, व्हिडियो कॉल आणि आक्षेपार्ह फोटोच्या जोरावर मग सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. जर टार्गेटने गोपनीय माहिती देण्यास मनाई केली तर त्याच्या सार्वजनिक आयुष्याला उद्धव्स्त करण्याची धमकी दिली जाते किंवा माहितीच्या बदल्यात लाच देण्याचीही ऑफर दिली जाते.

तपास यंत्रणेच्या पायाखालची जमीन सरकली

हनीट्रॅपमध्ये जवान अडकण्याच्या अशाच काही बातम्या समोर आल्या आणि तपास यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत सत्य घटना तर तेंव्हा समोर आली जेंव्हा एका राजस्थानमधील जवानाची अशाच एका घटनेत चौकशी झाली. चौकशीनंतर त्या जवानाने एक एक करून मोठ-मोठे खुलासे केले. यानंतर संपूर्ण प्रकारची चौकशी गुप्तचर विभागाकडून केली गेली आणि अजूनही तपास सुरु आहे. या तपासातून अखेर समोर आलं की पाकिस्तानी महिला ISI एजंटने कसे भारतीय जवानाला स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून हनीट्रॅपमध्ये अडकवले.

प्रदीप कुमार या जवानाचे वय आहे अवघे 24 वर्ष. हा जवान मूळचा उत्तराखंडमधील रुरकीचा. 3 वर्षे तो जोधपूरमध्ये तैनात होता. नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा या जवानाने त्या पाकिस्तानी महिला ISI एजंटशी फोनवर संभाषण केले आणि तेंव्हापासून सुरु झाला जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न.

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या सेनेतील गनर प्रदीप कुमारला या ISI महिला एजंटने आपले नाव रिया सांगून मैत्री केलेली. सोबतच आपण बंगळुरूमधील मिलिटरी नर्सिंगमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. यासोबतच आपण हिंदू आहोत हे भासवायला तिने आपल्या खोलीतील हिंदू देव देवतांचे फोटो लावलेले. या तसबिरींसोबत काढलेले फोटोही तिने शेअर केलेले. यावरून जवानाला ही सदर महिला हिंदूच असल्याचा भरवसा झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही एजंट या जवानाशी अस्खलित राजस्थानी भाषेत संवाद साधायची. म्हणूनच या जवानाला कधीही या एजंटचा संशय आला नाही. मीडिया रिपोर्टनुसार या महिलेने आतापर्यंत तब्बल दहा जवानांना हनीट्रॅपमध्ये अडकावल्याचे बोलले जातेय.

कधी पायल तर कधी प्रिया…

पायल शर्मा, हरलीन कौर पासून कधी प्रिया शर्मा, तर कधी रिया शर्मा… ही तीच नावं आहेत जी ISI एजंट्स स्वतःसाठी वापरत असत. याच नावाने सोशल मीडियावर रिल्सचे जाळे विणले जायचे आणि साधला जायचा जवानांवर निशाणा.
एका रिलमध्ये हिंदी गाण्याचा वापर करण्यात आला ज्यामध्ये, “आंखों के नीचे-नीचे, मैं तेरे पीछे-पीछे…” या वाक्यांचा वापर करून बनवला जातो एक मादक रील आणि तिथेच सुरवात होते मायाजाल विणायला.

दुसऱ्या रिलमध्ये एक मुलगा म्हणतो, “अकेला हूं मैं..”
मग ती महिला म्हणते, “साथ हूं मैं…”
लगेच मुलगा म्हणतो, “पता है आज बहुत उदास हूं मैं…”
त्यावर पुन्हा मुलगी म्हणते, “नजर उठा के देख.. तेरे पास हूं मैं…”
आणि या व्हिडीओमध्ये ती एजंट पुन्हा पुन्हा मादक सौंदर्याचा वापर करतच असते.

मिसाईल संबंधित माहिती पुरवल्याचा अंदाज

ISI च्या हनीट्रॅपमध्ये अडकलेला भारतीय लष्कराचा गनर प्रदीप याने पोखरणमधील क्षेपणास्त्र चाचणीच्या व्हिडिओसह अनेक गुप्त माहिती, व्हिडिओ तसेच फोटोही पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्याचा अंदाज आहे. सांगितले जातंय की या पाकिस्तानी एजंटच्या प्रेमात हा जवान एवढा वेडा झाला की त्याने त्या महिलेशी आपल्या इतर सात साथीदार मित्रांचीही ओळख करून दिली. तपास यंत्रणांकडून आता या सातही जवानांचीही चौकशी केली जातेय.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here