राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का

दोन महिला धावपटू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

  • टीम बाईमाणूस

बर्मिंगहॅम (Birmingham) येथील राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) स्पर्धेला सुरुवातच होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय धावपटू एस. धनलक्ष्मी आणि तिहेरी उडी राष्ट्रीय विक्रम धारक ऐश्वर्या बाबू यांना प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. ज्यामुळे खेळांपूर्वी भारतीय ऍथलेटिक्सवर सावली पडली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या गेम्समध्ये दोघेही सहभागी होऊ शकणार नाहीत. भारताची स्टार धावपटू धनलक्ष्मीची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भारतीय ऍथलेटिक संघ 100 मीटर रिलेमध्ये पदक जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. भारतीय खेळाडूंच्या परदेशात झालेल्या तयारीदरम्यान त्यांचे सॅम्पल घेण्यात आले होते, अशी माहिती आहे. पण, त्यानंतर देशातल्या नाडाच्या चाचणीत धनलक्षमीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. एश्वर्याने चेन्नईमध्ये तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता. तिने लांब उडीमध्ये 6.73 मीटर उडी मारली होती, जी अंजू बॉबी जॉर्ज (Anju Bobby George) 6.83 मीटर नंतर भारतीय महिला लांब उडीपटूची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. गेल्या काही महिन्यांतील हे तिसरे प्रकरण आहे, जेव्हा एआययूने डोपिंगसाठी भारतीय खेळाडूला दोषी ठरवले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानावर राहिलेली भालाफेकपटू राजिंदर सिंग, डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौर हेही एआययूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. वास्तविक, डोप चाचणी ही मानवी शरीराची एक प्रकारची तपासणी आहे, ज्यामध्ये खेळाडू/ऍथलीट आपली कामगिरी सुधारण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बंदी घातलेली औषधे वापरत आहेत की नाही हे शोधून काढले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, डोप चाचणीसाठी एआययूने धनलक्ष्मीच्या नमुन्यांची तपासणी केली होती. त्या तपासणीमध्ये धनलक्षनीच्या नमुन्यात स्टेरॉईड आढळले आहेत. त्यामुळे धनलक्ष्मीवर सध्या बंदी घालण्यात आली असून ती राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. त्याशिवाय धनलक्ष्मीला युगेन येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, धनलक्ष्मीने गेल्या वर्षी 100 मीटर शर्यतीत दुती चंदला पराभूत केले होते. त्याशिवाय धनलक्ष्मीने गेल्या महिन्यात 200 मीटरमध्ये हिमा दासचाही पराभव केला आहे.

S Dhanalakshmi

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही खेळण्यास बंदी

धनलक्ष्मीने गेल्या वर्षी भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. 400 मीटर रिले शर्यतीत हिमा दास आणि दुती चंद यांच्यासह धनलक्ष्मीचा संघात समावेश होता. धनलक्ष्मी 100 मीटर प्रकारात रिले शर्यतीव्यतिरिक्त भारताकडून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार होती. धनलक्ष्मी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना झालेली नाही. चॅम्पियनशिपच्या आयोजकांनी धनलक्ष्मीचे नाव काढून टाकल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच धनलक्ष्मी डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने तिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

धावपटू धनलक्ष्मीबद्दल..

धनलक्ष्मी सेकर ही तामिळनाडू येथील भारतीय धावपटू आहे. 2021 फेडरेशन चषक स्पर्धेतील 200 मीटर स्पर्धेत अनुभवी भारतीय धावपटू द्युती चंद आणि हिमा दास यांना पराभूत केल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने 2020 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. फेडरेशन चषकादरम्यान भारताच्या स्प्रिंट क्वीनच्या विजेतेपदासाठी तामिळनाडूच्या धावपटूने दुती चंद आणि हिमा दास यांच्यावर मात केली.

धनलक्ष्मीचा जन्म तिच्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी म्हणून झाला. तिच्या लहान वयातच तिचे वडील वारले आणि तिची आई कुटुंब चालवण्यासाठी घरकाम करू लागली. तिला दोन लहान बहिणी आहेत आणि त्यापैकी एकाचा 2021 मध्ये आरोग्याच्या समस्यांमुळे मृत्यू झाला. धनलक्ष्मी तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीजवळील गुंडूर गावातील आहे. खेळ हे फक्त तिच्या संघर्षाचे माध्यम बनवायचे. तिने मंगळुरू येथील अलावा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि जे काही तिला स्टायपेंड म्हणून मिळायचे ते ती तिच्या कुटुंबाला पाठवत असे. तिला सुरुवातीला तिच्या राहणीमानासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी चांगली नोकरी शोधायची होती.

आईने लपवला बहिणीचा मृत्यू

मुलीच्या ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम होऊ नये आईने काळजावर दगड ठेऊन तिच्या थोरल्या बहिणीचा मृत्यू लपवून ठेवला. कडवी झुंज देऊन धावपटू धनलक्ष्मी गेल्या वर्षा जेव्हा भारतात परतली तेव्हा तिरुची विमानतळावर लोकांनी तिचे जंगी स्वागत केले होते. यावेळी तिला बहिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यावर धनलक्ष्मी विमानतळावरच ओक्साबोक्सी रडली. धनलक्ष्मीची बहीण गायत्री 12 जुलै 2021 मध्ये मरण पावली. पण धनलक्ष्मीला 23 जुलैला टोकियोला जायचे होते. तिची मनस्थिती बिघडू नये म्हणून आईने ही गोष्ट तिच्यापासून लपविली. धनलक्ष्मी अत्यंत गरीब कुटुंबातून आली आहे. पंधरा वर्षांची असतानाच तिच्या वडलांचा मृत्यू झाला. आईने काबाडकष्ट करून तिला वाढविले. गरिबीशी झुंज देत धनलक्ष्मी लहानपणापासूनच धावण्याचा सराव करत होती. मार्च महिन्यात पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेमध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत धनलक्ष्मीने भारतीय ट्रॅकची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्युती चंदविरुद्ध विजय मिळवला. त्यामुळे दुती चंद आणि हिमा दास यांच्यासोबत तिचे नाव घेतले जाऊ लागले. सर्वोत्तम कामगिरी केली ज्यामुळे तिला ऑलिम्पिकची संधी मिळाली. धनलक्ष्मीला संघात पर्याय म्हणून ठेवण्यात आले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here