लॉनबॉल खेळणाऱ्या भारताच्या चार सुवर्णकन्या!

लॉन बॉल मध्ये भारताला इतिहासात पहिल्यांदाच मिळवून दिले सुवर्णपदक

टीम बाईमाणूस

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (commonwealth games 2022) सहभागी झालेल्या भारतीय चमूकडून वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये पदकांची अपेक्षा वर्तवली गेली होती पण लॉनबॉल (Lawn ball) या भारतासाठी अतिशय नवीन असणाऱ्या खेळात मातब्बर संघांना हरवून भारतीय संघाने सुवर्णपदक (gold medal) मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघाचा पराभव करत लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश असणाऱ्या या संघाने लॉनबॉल मध्ये प्रथमच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

या खेळात ४० पदके मिळवलेल्या तुल्यबळ न्यूझीलंड संघाचा प्रभाव करून काल भारतीय संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. भारताचे राष्ट्रकुल स्पर्धेमधील हे चौथे सुवर्णपदक असून भारतीय संघाकडून कुणीही यावेळी जिंकण्याची अपेक्षा केलेली नव्हती. विजयानंतर भावुक झालेल्या या चार खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात आणखीन एक मनाचा तुरा खोवला आहे.

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून भारताला हे सुवर्णपदक मिळाले आहे. भारतीय क्रीडाविश्वासाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब असून या चौघींनी मिळवलेले सुवर्णपदक भारतात लॉनबॉल या खेळाला लोकप्रिय करेल यात शंकाच नाही. रूपा राणी तिर्की हिने या संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ केला.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here