Beed : पारधी समाजातील तरुणाने आपल्याच घरावर लावला सीसीटीव्ही

पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बीडच्या शामल काळेने घरावर बसवले कॅमेरे !

सुकेशनी नाईकवाडे / १३ मे २०२२ :
असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं आणि हाच संशयाचा डाग पुसून टाकण्यासाठी बीडमधल्या शिरूरमध्ये राहणाऱ्या पारधी समाजातील एका तरुणाने समाजात सन्मानान जगता यावे, म्हणून स्वतःच्या घरावरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

ब्रिटीशांच्या काळात काही जातीतील लोकांना जन्मतःच गुन्हेगार समजले जायचे. स्वातंत्र्यानंतरही या समाजाबद्दल काही चुकीच्या धारणा आहेत आणि याच मानसिकतेतून काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी पारधी (paradhi) समाजातील लोकांना विनाकारण त्रास दिल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. (Beed) बीडमध्येदेखील “मला वेगवेगळ्या केसेस मध्ये अडकविण्याचा प्रयत्न पोलीस करत होते आणि माझा कुठलाही सहभाग नसताना खोट्या प्रकरणात गोवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते आणि म्हणून मी माझ्याच घरावर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. “

काळे कुटुंबीय त्यांच्याकडे असणाऱ्या शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात तर शामल काळे हा शिरूर येथे दहावीचे शिक्षण घेत आहे. त्याच्याकडे शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. एकीकडे शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या सामाजिक आणि आर्थिक लढाया लढत असतांना दुसरीकडे स्वतःवर नजर ठेवण्यासाठी अशाप्रकारे कॅमेरे बसवायला लागणे हे दुर्दैव आहे.

एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. आम्हाला देखील समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या वर होणारा अन्याय सिद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव सांगतात.

संबंधित घटनेचा व्हिडीओ :

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here