सत्तासंघर्षांच्या नादात महाराष्ट्रात कॉलराने चौघांचा मृत्यू

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली पण आजही मेळघाटात टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

  • आशय बबिता दिलीप येडगे

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरात कॉलरामुळे (Cholera) शेकडो नागरिक आजरी पडले असून चौघांचा या आजराची लागण झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असतांना आपण आपल्याच देशात राहणाऱ्या काही लोकांना पिण्यासाठी साधे, स्वच्छ पाणीसुद्धा उपलब्ध करून देत नसल्याने महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतातील भीषणता दाखविणारी ही घटना मेळघाटात घडली आहे, घडत आहे. आजही या परिसरामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाच डोंगरी आणि परिसरातील टँकर काही दिवस जाऊ शकले नाहीत आणि तहानलेल्या नागरिकांनी मग गावाशेजारी असणाऱ्या विहिरीतील दूषित पाणी पिले आणि याच पाण्यामुळे आतापर्यंत चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Melghat Cholera Patient

मेळघाट जिल्ह्यातील पाच डोंगर आणि कोईरी गावातील विहिरींचे दूषित पाणी पिल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आजारी पडलेल्या व्यक्तींची संख्या 231 वर पोहोचली आहे. पाच डोंगरी गावात दूषित पाण्याचा प्रादुर्भाव आणि अनेक ग्रामस्थांचे बिघडलेले आरोग्य यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची विविध पथके सध्या तेथे कार्यरत आहेत. कुंभारीचुरणी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 231 वर पोहोचली आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रानमले म्हणाले की, दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना कॉलराची लागण झाली आहे. यासाठी त्यांच्या वैयक्तिक वैद्यकीय तपासणीनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे सर्वांना ओआरएस पावडर दिली जात आहे. घटनेचे मूळ कारण शोधून काढल्यानंतर गावात सध्या मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

कोठे आणि किती रुग्ण आहेत?

पाच डोंगरी – 116
कोईलारी50
काटाकुंभ25
क्रशिंग40

आतापर्यंत यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून 100च्या वर नागरिक आजारी पडले आहेत

जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावातील उघड्या विहिरींचे दूषित पाणी पिल्याने पन्नास जण आजारी पडले होते. या सर्वांना जुलाब झाल्याचे निदान झाले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. 47 जणांची प्रकृती गंभीर आहे. आता या प्रकरणातील पीडितांची संख्या 231 पर्यंत पोहोचली होती.

या घटनेचे वृत्त समजताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्याशीसंवाद साधला. या सर्वांवर त्वरित उपचार केले पाहिजेत. गरज भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असली तरी उर्वरितांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीवरून दिली. या सर्व लोकांना योग्य उपचार मिळावेत आणि मृतांची संख्या वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच या प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here