महाराष्ट्र शासन करणार गडचिरोलीतील 41 पर्यटन स्थळांचा विकास

गडचिरोलीतील अपरिचित पर्यटन स्थळांचा विकास केल्याने नजीकच्या भविष्यात पर्यटन केंद्र नसलेल्या ठिकाणाचे संभाव्य पर्यटन केंद्रात रूपांतर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टीम बाईमाणूस / १२ जून २०२२

महाराष्ट्रातील गडचिरोलीचे रुपडे आता बदलण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने आदिवासीबहुल जिल्ह्यात 41 संभाव्य पर्यटन स्थळे निश्चित केली आहेत. गडचिरोली हा महाराष्ट्राच्या पूर्वेला वसलेला एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी 35% भूभागावर गर्द जंगल आहे. काही मोजकी ठिकाणे सोडली तरी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणे ही पर्यटकांना माहीतच नसल्याने दुर्लक्षित राहिली आहेत. लवकरच गडचिरोली मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक खुशखबर येणार आहे.

यापूर्वी गडचिरोलीमध्ये ग्लोरी ऑफ अल्लापल्लीसारखी जैवविविधतेचा वारसा असलेली काही पर्यटन स्थळे होती, त्याचबरोबर महाशिवरात्रीला मोठी जत्रा जिथे भरते असे मरखंडा मंदिर देखील गडचिरोली मध्ये आहे आणि वैरागड किल्ला देखील बऱ्याच जणांना माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जवळपास ८० ठिकाणे ही पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जाऊ शकतात मात्र या सर्व ठिकाणांना यापूर्वी प्राधान्य दिले जात नव्हते. मात्र जी ठिकाणे पर्यटकांना माहिती होती आणि जिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील बऱ्यापैकी होती अशाच ठिकाणांना सर्व शासकीय सुविधा दिल्या गेल्या. पर्यटनस्थळांच्या तीन वर्गवाऱ्या केल्या गेल्या आहेत ज्यामध्ये ए, बी आणि सी या कॅटेगरीचा समावेश होतो. या सर्व ४१ संभाव्य पर्यटन स्थळांना सी कॅटेगरीमध्ये वर्ग केलेले आहे.

जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला पर्यटनासाठी विकसित करावयाच्या ठिकाणांची यादी तयार केली असता त्यात ३५ ठिकाणे होती; नंतर, आणखी सहा ठिकाणे त्यामध्ये जोडली गेली, ज्यामध्ये वडधाम जीवाश्म पार्क, सिरोंचा घाट, नागराम घाट आणि टेकडा घाट यांचा समावेश करण्यात आला आहे.

पर्यटनासाठी ही ठिकाणे विकसित केल्याने जिल्ह्याची सकारात्मक प्रतिमा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. जी पूर्वीच्या काळात माओवादी गटांच्या मजबूत उपस्थितीमुळे अशांत जिल्हा अशी होती. जेव्हा अशा ठिकाणांना चालना दिली जाते तेंव्हा साहजिकच एक सकारात्मक परिणाम दिसून येतो. प्रशासन तसे करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्या सांस्कृतिक आणि पारंपारिक सभ्यतेला हानी पोहोचू शकते. गडचिरोली जिल्ह्याला समृद्ध असा आदिवासी वारसा आहे आणि त्यांच्या सुंदर आणि अनोख्या परंपरा आणि उत्सव उर्वरित जगाला सांगितल्या जाऊ शकतात. गडचिरोली ही निसर्गदत्त भूमी आहे, ज्यामध्ये निरोगी वनराई आहे. या जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य इतर जगाला दाखविल्याने स्थानिकांचा फायदाच होणार आहे हे मात्र नक्की.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here