स्वत:चे शिक्षण सुटले, पण पाड्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी बोट चालवते

  • टीम बाईमाणूस

पावसाळ्यात रस्ता खचल्यामुळे तिला तिचे शालेय शिक्षण अधर्वट सोडावे लागले होते. रस्ते बंद झाल्यामुळे धरणातून प्रवास करणे अतिशय जोखिमेचे असल्याने इच्छा असूनही तिला शाळेत जाता येत नव्हते. आपल्याला जो सामना करावा लागला तो आता पाड्यांतील इतर विद्यार्थ्यांना करावा लागू नये यासाठी तिने आता पूर्णपणे एका अशा कामात स्वत:ला झोकून दिले आहे की, पाड्यावरचा आता प्रत्येक विद्यार्थी शाळेत जातो.

कांता बरफ… ठाणे जिल्ह्याच्या गणेशपुरी भागातील पलाटपाड्याची एक तरुणी. पावसाळयात धरणातून प्रवास करावा लागत असल्याने आणि अनेक वेळा नौका उपलब्ध होत नसल्याने कांताला शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु अशी वेळ आपल्या पाडय़ातील अन्य विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून तिने नौकेचे सारथ्य करत विद्यार्थ्यांचा धरणातून प्रवास सुकर केला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती हे काम तितक्याच उत्साहात करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी भागातील पलाटपाडय़ातील या प्रकारामुळे असून यामुळे शासकीय यंत्रणेचीही अनास्था समोर आली आहे. ‘लोकसत्ता’ दैनिकामध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी भागातील पलाटपाडा – उसगाव दरम्यान एक कच्चा रस्ता आहे. पण, पावसाळय़ात कच्च्या रस्त्यावर चिखल जमा होऊन तो वाहतूकीसाठी बंद होतो. त्यामुळे पाडय़ातून अन्य भागात जाण्यासाठी उसगाव धरणातून (बंधारा) प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांचाही हाच उसगाव शाळेपर्यंत जाण्याचा मार्ग. मात्र पुरेशा नौका नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. यामुळे कांता बरफ विद्यार्थीनीला चार ते पाच वर्षांपूर्वी शाळा सोडावी लागली. त्यानंतर अशी वेळ आपल्या पाडय़ातील इतर विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून तिने निर्धाराने नौकेचे सारथ्य हाती घेत विद्यार्थ्यांचा धरणातील प्रवास सुकर केला. ती रोज पाडय़ातील सुमारे 30 मुलांना नौकेतून धरणाच्या पैरतीरावर घेऊन जाते. तिचा हा प्रवास अनोखा असला तरी शासकीय अनास्थेचेही दर्शन घडवते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. याच जिल्ह्यातील गणेशपुरी येथील उसगाव भागात धरण आहे. धरणाच्या पलिकडे सुमारे 80 ते 100 घरांचा पलाटपाडा आहे. पाडय़ातील नागरिकांसाठी उसगाव, गणेशपुरी हे मुख्य बाजारपेठ. येथील विद्यार्थीही पाडय़ात अंगणवाडी आणि शाळा नसल्याने गणेशपुरी – उसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी जात असतात. या धरणाला वळसा घालून एक कच्चा रस्ता आहे. त्या मार्गाने येथील नागरिक बाजारपेठेत जातात. परंतु पावसाळय़ात हा रस्त्यावर चिखल साचत असल्याने तो वाहतूकीसाठी बंद होतो.

80 ते 100 घरांच्या पलाटपाडय़ातील नागरिक पावसाळय़ात आजारी पडल्यास त्यांना नौकेतून धरण पार करत रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे वेळेत उपचार मिळाले नाहीतर जीव गमवावा लागण्याची शक्यता असल्याचे पाडय़ातील नागरिकांचे म्हणणे आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here