आणि चंद्रपूर मधली पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश झाली..

'मुस्लिम लडकीयॉं पढ़ती भी है और बढ़ती भी है'. चंद्रपूरच्या निकिशा पठाणने पहिली मुस्लिम महिला न्यायधीश होण्याचा मिळवला मान.

रक्षा फुलझेले/चंद्रपूर: जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असला की उंच भरारी घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. अगदी हेच खरं करून दाखवलं आहे चंद्रपुरच्या निकिशा या तरुणीने! निकिशा अशरफखान पठाण हिने न्यायाधीशाची अवघड परीक्षा उत्तीर्ण करून केवळ आई-वडिलांचेच नाही तर घुटकाडा वार्डातील लोकांचे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव मोठं करत, विशेषतः मुस्लिम समाजातील मुलीही त्यांना संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करून दाखतात हे सिध्द केलं आहे.

चंद्रपुरातील घुटकाडा परिसरात अश्रफ पठाण यांचे कुटूंब वास्तव्याला आहे. पठाण हे पाटबंधारे विभागात कायर्रत आहेत. मुलगी निकिषाला विधी शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. कुटुंबाचे सहकार्य व प्राध्यापकाच्या मार्गदर्शनामुळे निकिषाची शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातून एल एल बी चे शिक्षण पूर्ण झाले. विषम परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास करून न्यायाधीश होण्यासाठीची अतिशय कठीण परीक्षा निकिशाने उत्तीर्ण केली आहे. परिस्थिती कितीही खडतर असली तरीही जिद्दीने प्रयत्न करत राहिले तर त्याच यश नक्की मिळत. आसपासच्या लोकांमधून टोकाचा निरुत्साही प्रतिसाद असताना सुद्धा निकीशाने उत्तम अभ्यासाच्या बळावर हे यश खेचून आणले आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या सामाजातील सर्व तरुण मुलांसाठी निकिशा आज प्रेरणास्थान ठरली आहे.

निकिशाच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर हजरत टिपू सुलतान फाऊंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानने तिला उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाची प्रत, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी निकिशाने समाजातील तसेच इतर सर्व विद्यार्थांना मार्गदर्शन म्हणून कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य नियोजन, प्रयत्नांची पराकाष्टा आणि ते मिळवण्यासाठी जिद्द असली तर समाज कोणताही असो, परिस्थिती कशीही असो, तुमच्या यशाचा मार्ग एक दिवस नक्की तुम्हाला तुमच्या ध्येय पर्यंत नेऊन पोहचवतो असे मत व्यक्त केले. आजच्या सर्व विद्यार्थ्यांनी निकिशाची ही यशोगाथा डोळ्यसमोर ठेवून आपल्या ध्येयप्रापतीसाठी सखोल प्रयत्न करावे आणि आपल्या समाजाचे, शहराचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.

नवीन लेख

संबंधित लेख

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here