- टीम बाईमाणूस
केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या, बचत ठेवीच्या अनेक फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे ‘सुकन्या समृद्धी योजना’ आहे. या योजनेनुसार आईवडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते. सुकन्या समृद्धी खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी उघडले जाऊ शकते. योजनेत प्रत्येक कुटुंबासाठी फक्त दोन मुलींचा समावेश होता, हे खाते दोन्ही मुलींसाठी उघडले जात होते. पण आता या योजनेत बदल करण्यात आला असून दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्या असतील तर तिसरे खाते उघडता येईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील मुलींसाठी विविध योजना आणत आहे. या योजनांचा लाखो मुलींना फायदा होत आहे. सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. ज्यांना तीन मुली आहेत, त्यांना तिसरे खाते देखील उघडता येईल. पण त्यांनी सरकारने ठरवलेले निकष पूर्ण केले तरच. सुकन्या समृद्धी योजनेत एका मुलीनंतर जर दुसऱ्या प्रसूतीदरम्यान जुळ्या मुली झाल्या तर त्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो .
नेमकी काय आहे सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे. मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्या बँक किंवा पोस्ट खात्याला सुकन्या समृद्धी योजना असे म्हणतात.
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये व अधिकतम 1.5 लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त 15 वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात. पुढील 15 ते 21 वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते. या योजनेत 35.37 टक्के तुमची गुंतवणूक असते आणि 64.73 टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव अशी योजना आहे ज्यात तुम्ही फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश्य
- मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
- मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
- राज्यातील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त 15 वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचेआहेत.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
- मुलीचे वय 21 वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त 50 टक्के रक्कम काढता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला 50/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल. सुकन्या समृद्धी योजना 100 टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
- सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
- सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे.
- या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते.
- या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
- मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
- देशातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो.
- कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
- कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
- जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
- या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त 15 वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील 15 ते 21 वर्षे पैसे भरावे लागत नाहीत. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त 100/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान 30000/- रुपये ते 75000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला 600/- रुपये शिष्यवृत्ती प्रति 6 महिने आठवी, नववी, दहावी, अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
- अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
सुकन्या समृद्धी योजनेचा PDF फॉर्म :