छू लो आसमान… कोणी अडवलयं?

सर्वोत्तम पहाण्याच्या वृत्तीमुळे मनात अनुकूल परिणामांची कल्पना करतो, अपेक्षा करतो. त्याउलट नकारात्मक वृत्तीने फक्त ताण येतो. सकारात्मक दृष्टीकोन, वृत्ती म्हणजे परिस्थिती आणि स्वतःबद्दल आशावादी असणे.

  • मेघना धर्मेश

गणेशची प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी नेहमीच काही ना काही समस्या असायचीचं. जवळपास सहा महिने घरी राहिल्यावर त्याला एक नोकरीची संधी चालून आली. हो-नाही, घरापासून दूरचं आहे, पगार पण इतका काही खास नाही, कामाच्या वेळा जास्तचं आहे, अशी ना-ना ची गणेशची यादी तयार असल्यामुळे तो काही नोकरीच्या मुलाखतीला गेलाचं नाही. नोकरी तर हातची गेली आणि घरी बसून माझ्याचं बाबतीत असं का? हे नकारात्मक विचारचक्र मात्र त्याचे चालू होते. समस्या पाहण्यापेक्षा जर त्याने समाधान /उपाय ह्याकडे सकारात्मकतेने पहिले असते तर नक्की नोकरी मिळाली असती.

आपल्यातल्या बऱ्याचं जणांचं असं असतं ना? सफेद कागदावरच्या काळ्या बिंदूकडेचं लक्ष जास्त जातं, त्यांचं इतका मोठा सफेद कागद दिसतं नाही. जे सकारत्मक आहे ते बघावं, समस्या अडचणी हे कोणाच्या आयुष्यत नाही? सगळे जण आपापल्या परीने खास करून आपल्या मनोवृत्तीसह अडचणींना सामोरे जातात. आपापली लढाई लढत असताना, आयुष्याच्या संघर्षाला सामोरे जाताना कोणी आपल्या समस्यांचे रडत -कुढत पाढे वाचून तर कोणी कितीही आयुष्यात वादळे आली तरी हसतमुख राहून, धैर्याने परिस्थितीशी सामना करतात. खरंतर आपण कोणत्या गोष्टींकडे कसे पाहतो हे आपल्या मनोवृत्ती (attitude) वर अवलंबून असतं. लहान-सहान गोष्टींची चिंता करणे, कारण नसताना छोट्या गोष्टी मोठ्या करणे, अनावश्यक परिपूर्णता (unnecessary perfection) बघणं, खोट काढणं असे करणारे नकारात्मक विचारांनी आपल्या आयुष्याला उगीचंच दुःखी बनवतात. तर, चला आहे हे असं आहे, बघूया काय जमेल ते समस्येचे समाधान काढूया, असे सकारात्मक मनोवृत्तीवाले विचार करतात, जीवनाचा challenge म्हणून स्वीकारतात आणि पुढे जातात.

फक्त समस्या-समस्या करून आपणहून काही प्रश्न सुटणार आहेत का? महत्वाचे असते ते रडतं न बसता प्रश्नांची उत्तरे आपणं कशी शोधतो ते. आव्हाने हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतातचं. मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक. साधं सरळ असं तर कुणाचंचं आयुष्य नसतं. चढ उतार, सुख-दुःख हे तर part & parcel of life आहेत. मग आपल्याचं हातात असतं, कसं आयुष्य सकात्मकतेनं जगावं. अडचणी आहेत मग करू या की त्यावर मात ह्या सकात्मकतेनं आपला तणाव नक्कीचं कमी होतो. फक्त समस्येवर लक्ष केंद्रित न करता आपणं त्यावर काय निवारण शोधतो, कसे शोधतो त्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. उगीचचं प्रत्येक गोष्टीचे भांडवल करू नका. उत्तरं शोधा, समाधान शोधा आणि कामाला लागा.
नक्कीचं, हे इतके साधे-सोपे नाही पण इथे आपली मनोवृत्ती आपल्या मदतीला येते. सकारात्मक दृष्टीकोन आपणं एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो, आयुष्यातल्या घटनांना कशी प्रतिक्रिया /प्रतिसाद देतो, ह्यासाठी मदत करतो.

संबंधित वृत्त :

सर्वोत्तम पहाण्याच्या वृत्तीमुळे मनात अनुकूल परिणामांची कल्पना करतो, अपेक्षा करतो. त्याउलट नकारात्मक वृत्तीने फक्त ताण येतो. सकारात्मक दृष्टीकोन, वृत्ती म्हणजे परिस्थिती आणि स्वतःबद्दल आशावादी असणे. काही लोकं कायम स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगतात त्यामुळे त्यानां नेहमीचं हताश वाटतं. लहान- सहान सर्वचं गोष्टीमुळे नैराश्य येतं. जेव्हा कठीण परिस्थितीतही आपणं आशावादी राहतो, सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो तेव्हा आपणं अर्धी लढाई जिंकलेली असते. आपल्या सकारात्मक वृत्तीमुळे आपणं आनंदी राहतो,प्रत्येक छोट्या गोष्टी वैयक्तिकरित्या घेत नाही,आपल्या आयुष्यात रचनात्मक बदल घडवून आणण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन खूप महत्वाचा आहे. आपले सकारात्मक विचार आपल्या जीवनात आशावाद आणतात आणि चिंता आणि नकारात्मक विचार टाळण्यासाठी मदत करतात.

उत्तम आरोग्य, सक्रिय मन, कामाच्या ठिकाणी आणि घरी सर्वांशी चांगले संबंध आणि उत्तम सामाजिक जीवन हे आपणं आपल्या सकारत्मक विचाराने नक्कीचं साध्य करू शकतो. यासाठी आपले विचार चांगले ठेवा, चांगले बोला -तुम्ही जे बोलता ते तुमच्या विचारातून निर्माण होते, सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा, वर्तमानात जगा, चांगल्या सवयी लावा, छंद जोपासा महत्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करा. सकारात्मक मानसिकता यश, समाधान आणि आनंद यासाठी महत्त्वाची आहे. सकारात्मकता म्हणजे जीवनात आशावादी असण्याची प्रवृत्ती. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा आणि आयुष्यासाठी कृतज्ञता ठेवा, मग बघा बदललेले विचार आपल्याला नक्कीचं छू लो आसमान म्हणतील !

संपर्क – 9321314782

ईमेल – meghana_25@hotmail.com

नवीन लेख

संबंधित लेख

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here