नागपूरच्या असंग वानखेडे यांच्या पुस्तकाचे ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रकाशन

  • प्रतिनिधी चंद्रपूर

नागपूर येथील असंग वानखेडे यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणावर आधारित ‘अफर्मेटिव्ह ऍक्शन फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन अँड अपर कास्ट इन इंडियन कॉन्स्टिटयूशनल लॉ’ या पुस्तकाचे ऑक्सफर्ड विद्यापीठात नुकतेच प्रकाशन पार पडले. यावेळी प्रकाशन समारंभात अतिथी म्हणून सोआस विद्यापीठ लंडनचे प्रा.जेन्स लेरचे, ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा.डॉ.बारबरा हवेलकोवा व डॉ.अभिनव चंद्रचूड आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूर येथील असंग वानखेडे हे सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टरल स्कॉलर असून कायद्यात पीएचडी करत आहेत.

असंग वानखेडे - baimanus

अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या आरक्षणाचा इतिहास, आरक्षणाला घेऊन होत असलेले राजकारण, महाराष्ट्र, गुजरात व हरियाणा येथे मराठा, जाट व पटेल-पाटेदार यांना देण्यात आलेल्या आरक्षणाचा अभ्यास, संविधान सभेतील आरक्षणावरची मांडणी व सर्वोच्च न्यायालयाचे तसेच उच्च न्यायालयाचे आरक्षणासंदर्भात देण्यात आलेले जवळपास 40 न्याय निर्णयांची अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकात ककरण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन जगप्रसिद्ध राउटलेज पब्लिशिंग हाऊसने केले आहे, हे विशेष!

देशात आरक्षण प्रणाली संपुष्टात येत असून त्याऐवजी कमुनल कोटा निर्माण केला जात आहे. शोषित समाजाच्या उद्धारासाठी व त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी अस्तित्वात आलेल्या आरक्षणाच्या तरतुदीचे उल्लंघन करून त्याच्या विपरित संविधान विरोधी कार्य देशात सुरु आहे, यावर लढा उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत असंग वानखेडे यांनी प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here