पीसी सोलंकी : बंदे मे था दम…

राम जेठमलानी, सलमान खुर्शीद आणि सुब्रमण्यम स्वामी यासारख्या दिग्गज वकिलांनाही कोर्टात पराभूत करणारा एक सामान्य पण निडर वकील म्हणजे पीसी सोलंकी. तोच वकील ज्याने आसाराम बापूला बलात्कारप्रकरणी तुरुंगात धाडले.. पीसी सोलंकीच्या व्यक्तिरेखेवर आधारित 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट पाहायलाच हवा…

  • टीम बाईमाणूस

अत्यंत कसदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा ओटीटीवर प्रदर्शित झालेला चित्रपट 2023 मधला एक सर्वोत्तम चित्रपट म्हणून लोकप्रिय ठरू पाहत आहे. 2013 सालच्या आसाराम बापूने केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकील पूनम चंद सोलंकी यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटात अर्थातच मनोज बाजपेयीने याच वकिलाची भूमिका साकारली आहे.

‘ट्रेलर’ प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट वादात अडकला होता. आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली होती. ट्रस्टच्या वकिलांनी चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशनवर बंदी आणण्याची मागणी केली होती. नोटीस जारी करताना बापूच्या वकिलाने म्हटले होते की, हा चित्रपट आक्षेपार्ह आणि त्याच्या अशिलाची बदनामी करणारा आहे, त्यामुळे त्याची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. तसेच त्याच्या भक्तांच्या आणि अनुयायांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. राजस्थानच्या न्यायालयाने आता चित्रपटाच्या निर्मात्याकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.

कोण आहेत वकील पीसी सोलंकी?

वकील पूनम चंद सोलंकी उर्फ ​​पीसी सोलंकी हे 2013 मध्ये आसाराम विरुद्धच्या बलात्कार प्रकरणात 16 वर्षीय मुलीचे कायदेशीर सल्लागार होते. रिपोर्ट्सनुसार, पूनम चंद सोलंकीचा जन्म राजस्थानच्या जोधपूरमध्ये रेल्वे मेकॅनिकच्या घरी झाला. त्यांना तीन बहिणी आहेत. मर्यादित उत्पन्न असूनही त्यांच्या कुटुंबाने सोळंकी यांना त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते विधी महाविद्यालयात गेले. पी सी सोळंकी 1996 मध्ये बारचे सदस्य झाले.

जेठमलानी, खुर्शीद आणि सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध पीसी सोलंकी

आसाराम विरुद्ध खटला लढण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या पालकांनी 2014 मध्ये सोलंकी यांच्याशी संपर्क साधला होता. सोलंकी यांनी सलमान खुर्शीद, सुब्रमण्यम स्वामी, राम जेठमलानी आणि केटीएस तुलसी यांसारख्या दिग्गज वकिलांच्या विरोधात लढा दिला होता, जे या खटल्यात आसारामने केलेल्या वकिलांपैकी होते.

करोडो रुपयांची ऑफर, पण माघार नाही

सोलंकी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, सुरुवातीला त्यांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली होती आणि नंतर या प्रकरणातून माघार घेण्याची धमकी देण्यात आली होती. पण त्यांनी माघार घेतली नाही. सोलंकी यांची खटल्यासाठी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा त्यांनी त्या अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाकडून एक पैसाही घेतला नाही. मुलीचे पालक त्यावेळी आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते.

चित्रपटाविषयी माहिती देताना मनोजनं दिलेल्या मुलाखतींमधून बंदाविषयीची उत्सुकता वाढली आहे. वकील पुनम चंद्रा ही व्यक्तिरेखा एवढी महत्वाची का आहे याचे कारण म्हणजे, आसाराम बापूंना झालेली अटक, त्यांचे जेलमध्ये जाणे, या केसमध्ये पुनम चंद्रा यांची वकील म्हणून असणारी भूमिका महत्वाची होती. याप्रकरणात सोलंकी यांना कोट्यवधी रुपयांचे अमिषही दाखवण्यात आले होते. मात्र ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाही. एका बातमीनुसार, मनोजनं सांगितलं आहे की, चित्रपटाचे शुटींग पूर्ण होईपर्यत सोलंकी आमच्यासोबतच होते. त्यांनी केलेल्या सुचना महत्वाच्या होत्या. त्यांना मी प्रश्न विचारला होता की, तुम्हाला ही केस घेण्यामागे काय भूमिका होती आणि तुम्हाला भीती वाटली नाही का… यावर ते म्हणाले, मला माझ्या लहान मुलीनी या घटनेच्या विरोधात लढण्याचे बळ दिले. आणि मी ती लढाई शेवटपर्यत सुरु ठेवली. मनोजनं देखील आपण हा चित्रपट त्या घटनेतील पीडितेला समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.

आसाराम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे

आसारामचे गुन्हे 2013 मध्ये पहिल्यांदा उघडकीस आले होते. ऑगस्ट 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आसारामने आपल्या मुलीवरील भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या पालकांचा आहे. पीडित मुलगी 15 ऑगस्ट 2013 रोजी आसारामच्या जोधपूर आश्रमात गेली होती. त्याच दिवशी आसारामने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 20 ऑगस्ट 2013 रोजी पीडितेच्या पालकांनी एफआयआर दाखल केला. पाच वर्षांनंतर एप्रिल 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात आसारामला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सिर्फ एक बंदा काफी है - baimanus

‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जाताना दिसतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन शोषणाचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंददेखील पोलीसदेखील त्या बाबाला अटक करतात. दरम्यान बाबांचे भक्त संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान मुलीचे आई-वडील पीसी सोळंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहायला हवा.

काय आहे कथानक?

‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जाताना दिसतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन शोषणाचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंददेखील पोलीसदेखील त्या बाबाला अटक करतात. दरम्यान बाबांचे भक्त संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान मुलीचे आई-वडील पीसी सोलंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहायला हवा.

या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हा चित्रपट अगदी ‘टू द पॉइंट’ आहे. कुठेही जास्तीचा ड्रामा नाही, फाफटपसारा नाही. अगदी सुरुवातीच्या फ्रेमपासूनच हा चित्रपट थेट मुद्द्याला हात घालतो. कथा किंवा पटकथा कुठेही रेंगाळत नाही आणि यामुळेच प्रेक्षकही खुर्चीला खिळून राहतात. याबरोबरच हा चित्रपट एक उत्तम कोर्टरूम ड्रामाही सादर करतो, जो गेल्या बऱ्याच कालावधीत हिंदी चित्रपटांत पाहायला मिळालेला नाही. बाकी दोन तास सात मिनिटांच्या या चित्रपटात संगीत हे केवळ नाट्य गडद करण्यापुरतंच आहे, कारण या चित्रपटाचा खरा हीरो याची कथा आहे आणि त्यालाच यात महत्त्व देण्यात आलं आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here