- टीम बाईमाणूस
मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स अशा विषयांवरच्या वेबसिरीज प्रेक्षकांना पसंत पडत असल्यामुळे सध्या अशाच जॉनरच्या सिरीज अधिकाधिक तयार होत आहेत त्यातही जर अशा कथानकावर आधारित वेबसिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मा सारखे तगडे कलाकार असतील आणि रिमा कागती सारखी कसलेली दिग्दर्शक असेल तर ही सिरीज प्रेक्षक का नाही उचलून धरणार? नुकतीच ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेली ‘दहाड’ ही सिरीज म्हणूनच लोकप्रिय होत चालली आहे.
‘दहाड’ चा पहिला भाग पाहिल्यानंतर ही सिरीज ‘लव्ह जिहाद’ या सध्याच्या ज्वलंत विषयावर आधारित आहे असे वाटत असतानाच दुसऱ्या भागापासून ही सिरीज एकदम नव्या विषयाकडे वळते. राजस्थानमधील एका छोट्या गावातील गोष्ट ‘दहाड’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या गावातील एक मुलगी अचानक गायब होते पण यागोष्टीची पोलिसांकडून दखल घेतली जात आहे. मुलीचा भाऊ वारंवार पोलिसांकडे जातो. मात्र ते त्याच्या तक्रारीची नोंद करुन घेत नाहीत. दरम्यान ठाकूर समुदायातील एक मुलगी एका मुस्लीम धर्मातील मुलासोबत स्वत:च्या मर्जीसोबत घरातून पळून जाते. मुलीचं घराणं राजकारणी असल्यामुळे पोलिसदेखील तिचा शोध घेतात. मुस्लीम धर्मातील मुलासोबत पळून जाणं मुलीच्या घरच्यांना पसंत पडलेलं नसतं. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत असतात. दरम्यान आधी अचानक गायब झालेल्या मुलीचा भाऊ माझी बहिणदेखील एका मुस्लीम धर्माच्या मुलासोबत पळून गेली असू शकते, असा संशय पोलिसांकडे व्यक्त करतो. त्यानंतर सिनेमाच्या कथानकात एक ट्विस्ट येतो. 27 मुलींना मारणारा एक नराधम समोर येतो. हे सर्व कसं घडतं या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘दहाड’ या वेब सीरिजचे एकूण आठ भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. रीमा कागती आणि रुचिका ओबरॉने ‘दहाड’ या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या घटना सीरियल किलरच्या शिकार झाल्याचे समजताच अंजली या प्रकरणाचा छडा कसा लावते, हे या सीरिजमधून दाखविण्यात येणार आहे. तर या सीरिजमध्ये गुलशन देवैया आणि सोहम शाह हेही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘दहाड’ वेब सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा महिला पोलीस अधिकारी अंजली भाटी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षी ओटीटीवर पदार्पण करीत आहे. पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिने दमदार कामगिरी केली आहे. या सीरिजसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. आपल्या भाषेवर आणि बॉडी लॅंग्वेजवर तिने घेतलेली मेहनत सीरिजमध्ये दिसून येत आहे. सोनाक्षी ही मुळची राजस्थानची नसूनही ती ही भाषा शिकली आहे. विजय वर्माच्या अभिनयाचं कौतुकचं. आपल्या कामाने सर्वांना थक्क करण्यात तो यशस्वी झाला आहे. सरळ मार्गाने जाणाऱ्या प्रोफेसरच्या आयुष्यात कसा ट्विस्ट येतो हे पाहण्याजोगं आहे. विजय वर्माने आपल्या भूमिकेत वेगवेगळ्या शेड्स दाखवण्यात आलं आहे.
एक्सेल एंटरटेनमेंटचे सह-निर्माता रितेश सिधवानी, म्हणाले की, “दहाडचे आकर्षक कथानक आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय या क्राईम-ड्रामाला विलक्षण बनवतो. खरे सांगायचे तर, रीमा आणि झोया यांनी खूप संयम आणि समन्वयाने या कथेसाठी एका अनोख्या जगाची कल्पना केली आणि ते पडद्यावर खूप उत्तमरित्या दाखवले. ते पुढे म्हणाले, ‘मेड इन हेवन, मिर्झापूर आणि इनसाइड एजच्या शानदार यशानंतर, प्राइम व्हिडिओसोबतची ही भागीदारी यशस्वी होईल आणि जगभरातील प्रेक्षक या थरारक प्रवासाचा आनंद लुटतील अशी आम्हाला खात्री आहे.’