कोण ही सदू माता, जिथे चक्क सिंदूर लावून आणि साडी नेसून पुरुष खेळतात गरबा?

  • टीम बाईमाणूस

नवरात्रीला पुरुष आणि स्त्रिया देहभान विसरून गरबा खेळतात. गरबा खेळण्यासाठी स्त्रिया चनियाचोली तर पुरुष विविध प्रकारचे जॅकेट्स आणि कपडे खरेदी करतात. पण तुम्ही कधी पाहिलंय का की पुरुष स्त्रियांप्रमाणे साडी नेसून भांगेत सिंदूर भरून गरबा खेळताना? पण देशातील गुजरात या राज्यात एका समाजात ही परंपरा असून येथील पुरुष नवरात्रीच्या दिवसात साडी घालून मंदिराच्या बाहेर गरबा खेळतात.

जुन्या अहमदाबादमध्ये ‘हलीम की खडकी’ ह्या जागेत सदू मातेचे एक देऊळ आहे तिथे प्रत्येक नवरात्राच्या अष्टमीला बारोट समाजातील पुरुष स्त्री-वेष घेऊन सदू माते समोर गरबा करतात.

पुरुष महिलांप्रमाणे साडी नेसतात, नंतर कपाळावर सिंदूर लावतात आणि मग गरबा करतात. तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल. पण, हा गरबा जरा खास आहे. अहमदाबादच्या कोड एक्स्टेंशनमध्ये नवरात्रीच्या आठव्या दिवशी ही आशय प्रकारे गरबा खेळण्याची ही अनोखी परंपरा आहे.

यामध्ये पुरुष महिलांचे कपडे घालून रात्री गरबा खेळतात. ही परंपरा एका सत्य घटनेवर आधारित आहे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी ही बारोट समाजातील अत्यंत देखणी सदू बाई तिथल्या शासनकर्त्याच्या नजरेस पडली आणि त्याने तिला ‘बोलावणे’ धाडले. नवरा आणि लहान मूल घेऊन ही कचेरीत हजर तर झाली पण आता आपल्याशी काय होणार ह्याची चाहूल लागताच तिने बारोट समाजातील पुरुषांना आवाहन केले की तिच्यासाठी शासना विरुद्ध लढावे, पण राज्यकर्त्यांना घाबरून बारोट पुरुष घरा बाहेरच आले नाहीत.

त्यावर संतापलेल्या सदूने त्यांना शाप दिला, “बाईपण काय हे जर कळले नाही तुम्हाला, तर ह्या पुढे पुरुष देखील राहणार नाही तुम्ही, निर्वंश व्हाल.” एवढे बोलून तिने नवऱ्याच्या हातात तलवार देऊन तिचे मुंडके उडवायला सांगितले. हतबल नवऱ्याने तिचे शीर तर छाटले पण त्या नंतर मोठा हलकल्लोळ झाला. ती नवरात्र-अष्टमीची रात्र होती. पश्र्चातापाने होरपळलेल्या बारोट पुरुषांनी व्रत घेतले की प्रत्येक वर्षी नवरात्र अष्टमीला ते स्त्री वेश धारण करून सदू मातेची पूजा अर्चना करतील, गरबा खेळून तिला साकडं घालतील, तिची मनोभावे क्षमा मागतील. तेंव्हा पासून म्हणजेच अंदाजे 200 वर्षं पासून ही प्रथा सुरू आहे सदू माता नी पोळ (बोळ) येथे.

सदुबाच्या मृत्यूनंतर तेथे मंदिर बांधण्यात आले. त्याला सदू माता मंदिर असे नाव देण्यात आले. बारोट समाजाच्या लोकांमध्ये जवळपास शतकभर हा शाप कायम राहिला. शापापासून मुक्ती मिळावी म्हणून सदू मातेला वचन देण्यात आले की नवरात्रीला बारोटचे पुरुष महिलांच्या रूपात सदू मां मंदिरात येतील आणि गरबा खेळतील, तेव्हापासून नवरात्रीच्या आठव्या रात्री पुरुष बारोट समाजातील महिलांचे कपडे परिधान करून मंदिराच्या चौकात गरबा खेळतात.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here