अदिला नसरीन आणि फातिमा नूरा यांची टुगेदर फॉरेव्हर वाली प्रेमकहाणी..

''फोटोशूटची कल्पनाच मुळात छान होती. मग सहज करून बघू म्हणत आम्ही फोटोशूट करून बघितलं'' - अदिला नसरीन

  • टीम बाईमाणूस

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढलं. जसा काळ पुढं सरकतो आहे त्याचपद्धतीने समलिंगी लैंगिक संबंधांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढते आहे. पण असे संबंध असणाऱ्यांना आजही स्वीकारलं जात नाही हे देखील तितकंच खरं आहे. यावर्षाच्या सुरुवातीला अदिला नसरीन आणि फातिमा नूरा या तरुणींची नावं बऱ्याच वृत्तपत्रात छापून आली होती. या मुलींच्या पालकांनी त्यांना जबरदस्तीने वेगळं केलं होतं. पण केरळमधील न्यायालयाच्या एका निर्णयाने या दोघी पुन्हा एकत्र आल्या.

अदिला आणि नूरा या दोन तरुण मुलींना अनेक त्रासाने सामोरं जावं लागत होतं, त्यामुळे यातल्या एकीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता मागच्या महिन्यात या मुली पुन्हा चर्चेत आल्यात. त्याच्या मागचं कारण म्हणजे एका वेडिंग फोटोशूटसाठी या दोघींनी कपल पोज दिली आहे.

“मी आता कोणत्याही गोष्टीसाठी बदलणार नाहीये. मी तो जगण्यातला वाईटपणा सोडून आता पुढे आली आहे.” – नूरा फातिमा

एर्नाकुलम जिल्ह्यात असणाऱ्या समुद्रकिनारी हे फोटोशूट पार पडलं. त्यावेळी या दोघी एकमेकींना अंगठ्या घालताना, गुलाबाचे हार एकमेकींच्या गळ्यात घालताना दिसून येतात. या दोघींनीही चांदीचे दागिने, निळ्या तपकिरी रंगाचे लेहेंगे घातलेत.

दोघीनींही त्यांच्या त्या स्पेशिअल मोमेंट्सचे फोटो त्यांच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सवर शेर केलेले आहेत. त्यानें ह्या फोटोजला कॅप्शन देत लिहलंय की, “अचिव्हमेंट अनलॉक : टूगेदर फॉरेव्हर”.

नूरा आणि नसरीन यांना केरळच्या उच्च न्यायालयाने एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. परंतु भारतात विवाहित जोडप्याला जे विशेषाधिकार मिळतात ते त्यांना कधीच मिळणार नाहीत.

नूरा आणि नसरीन या हायस्कूलमध्ये असताना एकमेकींच्या जवळ आल्या. शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्या आपल्या पालकांसोबत केरळ राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत होत्या. या तीन वर्षांच्या काळात त्या कॉलवर बोलायच्या.

या दोघीही सांगतात की, त्यांनी त्यांच्या भूतकाळात काहीही गमावलेलं नाही. त्या सोशल मीडियावर ज्या पोस्ट शेअर करतात त्यातून त्यांना हवं असणारं स्वातंत्र्य दिसून येतं.

एकेकाळी त्या हात धरलेले किंवा मागून काढलेले फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करायच्या. पण आता त्यांच्या फोटोमध्ये त्या स्वतःचं विश्व निर्माण करताना दिसतात. मित्रांसोबत फिरताना, कुत्र्याला मोठं करताना असे बरेचसे रिल्स त्यांच्या पेजवर पाहायला मिळतात.

त्या दोघी सांगतात की, त्यांना लोकांनी जो पाठिंबा देऊ केलाय त्यामुळे सतत प्रेरणा मिळते आहे. त्यांनी बरेच इंटरव्ह्यू दिले आहेत, एका लोकप्रिय महिला मासिकात त्यांना स्थान मिळालंय. एका टीव्ही शोमध्ये त्यांची स्टोरी सांगण्यात आली आहे. जसा त्यांना पाठिंबा मिळतो तशीच त्यांची अवहेलना करणारे लोक सुद्धा आहेत. हे लोक त्यांना सांगतात की, त्यांनी समाजासमोर एक वाईट उदाहरण ठेवलंय. त्यांनी पुरुषांशी लग्न करायला हवं.

मध्यंतरी एका इन्स्टाग्राम युजरने त्यांच्या पोस्टखाली कमेंट केली होती की, सेक्शुआलिटी ही एक फेज असावी कारण त्याने 40 वर्षांच्या पुढच्या लेस्बियन कधीच पाहिल्या नाहीयेत. यावर त्या दोघींनी कमेंट करत म्हटलंय की, “आम्ही चाळीशीच्या होईपर्यंत वाट बघ.”

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here