- ऋषिकेश मोरे
आज जागतिक फोटोग्राफी दिवस… जगभरातील अनेक छायाचित्रकार त्यांच्यानुसार जग दाखवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांचं आयुष्य माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सर्वसाधारण आयुष्यात अडचणींचा बाऊ न करता समाधानाचं आयुष्य जगणाऱ्या आणि चेहऱ्यावर हसू गोंदलेल्या या ग्रामीण भागातील महिलांचं आयुष्य दाखवण्याचा हा एक छोटा प्रयत्न…

- नंदुरबार मधील लक्कडकोट या छोट्याशा गावातील या आदिवासी महिला… गावातील एक कार्यक्रम बघण्यासाठी बसलेल्या असताना काढलेला हा फोटो…

- आपल्या पालकांसोबत एसटीने प्रवास करणारी ही चिमुकली..

- सकाळचं काम आटोपून शृंगार करणाऱ्या आज्जी…

- घराच्या बाप्यांकडून घरकामात मदतीची अपेक्षा न करता ग्रामीण भागातील महिला स्वतः ला घरकामात झोकून देतात…

- आपल्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात आनंदी असणारी आई…

- आपलं घर चालवण्यासाठी शहरात इस्त्रीचं दुकान चालवणाऱ्या आज्जी…

- शेतातील कोठ्यात संध्याकाळी चहा बनवणाऱ्या आजी…

- शेतातील काम आटोपून स्वयंपाकासाठी जळतन म्हणून गौऱ्यांचा भारा घरी घेऊन जातांना शेतकरी महिला..

- सकाळी सूर्योदयावेळी ग्रामीण भागातील महिला आपलं शेणाचं घर सावरून घेत असतात…

- ग्रामीण भागातील वृद्ध महिलांना कॅमेऱ्याचा अप्रूप वाटतं. कुणीतरी आपला फोटो काढतंय म्हणून डोक्यावर पदर घेऊन स्मित करणाऱ्या वयोवृद्ध आज्जी..

- छत्रपती संभाजीनगर शहरातील 2023 सालच्या भीमजयंतीचा हा फोटो…

- मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी प्रवासभाड्यात 50% सूट जाहीर केली. पण प्रवासी महिलांची संख्या वाढल्याने एसटीमध्ये अनेक ठिकाणी जागेचा प्रश्न उद्भवतोय. अश्यात अनेकदा महिलांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो.

- कामाच्या शोधात अनेक कुटुंबांना स्थलांतर करावं लागतं. यात घरातील लहान मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. आजही इथली व्यवस्था कामगार समाजाच्या डोक्यावर पाय देऊन बसली आहे हे दर्शवणारा हा फोटो…