प्रभावी व्यक्तिमत्व आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या

पुढाकार घेतल्याशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर पुढाकार घ्यावाच लागतो. परंतु पुढाकार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं हेच कित्येकांना माहीत नसतं. तर पुढाकार कसा घ्यायचा आणि प्रभावी व्यक्तिमत्व बनविण्यासाठी कसा उपयोगात आणायचं याविषयी काही टिप्स

  • मेघना धर्मेश

आकाशने ही कंपनी नवीनचं join केली होती, कामं तर खूपचं होतं, जो तो आपापली कामाची जबाबदारी व्यवस्थित पारं पाडत होते. आकाश नवीन असल्यामुळे त्याच्याकडे जास्त कामं नव्हतं. तो त्याची दररोजची कामे करून आपल्या डिपार्टमेंटला अजून काय कामं चालतं, कसं चालतं हे बारकाईने निरीक्षण करायचा. स्वतः आपल्या डायरीमध्ये सर्व नोंदी ठेवायचा, मग हळूहळू तो ज्यांच्या कडे जास्त काम आहे त्यांची परवानगी घेऊन त्यांना मदत करायला लागला. कुठे अडचण आली, समजले नाही तर व्यवस्थित विचारून सगळं समजून घ्यायचा. त्यामुळे कामात कोणतीचं चूक न करता तो सगळी कामं चोखं करू लागला. बघता बघता सहा-सात महिन्यांत कोणी नाही आले तरी आकाश एक हाती सर्व त्याच्या डिपारमेंटचं कामं सांभाळू लागला.

बऱ्याचदा होतं काय काही जणं जादा जबाबदारी नको, आहे ते ठीक आहे म्हणून स्वतःच्या comfort zone मध्ये असतात. आजच्या स्पर्धात्मक जगात तुम्ही आपणहून जेवढे नवीन शिकाल, पुढाकार घ्याल तेवढा त्याचा फायदा, उपयोग आपल्याला नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीचं होतो.

संबंधित वृत्त :

प्रभावशाली व्यक्ति - baimanus

पुढाकार घेण्यासाठी आपणं काही गोष्टी आपल्या बाजूने सकारात्मक परिणामांसाठी नक्की करू शकतो :

  • कामाचे स्वरूप व्यवस्थित जाणून घेऊन, आपण काय योगदान (contribution) देऊ शकतो, ते बघणे.
  • समस्या, अडचणी आल्या तर आपणहून विचारणे.
  • आपल्या कामांत सुधारणा होईल, आपण नवीन काही शिकू अश्या संधीच्या शोधात रहाणे.
  • स्वतःहून अजून अतिरिक्त जबाबदाऱ्या घेणे.
  • सक्रिय रहाणे, मदतीसाठी तत्पर रहाणे.

    जेव्हा तुम्ही पुढाकार घेता तेव्हा तुम्हाला आपल्या कामाची जबाबदारी माहिती असते. तुमची जबाबदारी समजून तुम्ही सर्व वेळेत पूर्ण करता. वरिष्ठ तुम्हाला कामं करा, कामं लवकर पूर्ण करा असे तुमच्या पाठी लागतं नाही. पुढाकार घेण्याच्या वृत्तीमुळे तुम्ही कायम अतिरिक्त जबाबदारी, नवीन कल्पना, स्वतःमध्ये सुधारणा ह्या बाबतीत उत्साही असता. असे पुढाकार घेणारे कर्मचारी कोणत्या कंपनीला नको असतात? आपणं जेव्हा human resources – मानवी संसाधने म्हणतो तेव्हा पुढाकार घेणारे कर्मचारी हे कंपनीसाठी Asset असतात. जेव्हा तुम्ही पुढाकार घेता तेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी अतिरिक्त देण्याचा प्रयत्न करता समस्या सोडवण्यासाठी. ग्राहक सेवा, चौकशी ह्या सर्व ठिकाणी तुम्हाला ग्राहकांना इथून तिथे पाठवून उपयोग नाही.


त्यांच्या समस्येचे निवारण कसे होईल? त्यांची अडचण कशी सोडवता येतील ह्या सर्वांसाठी पुढाकार घ्यावा लागतो. होईल, बघू असे म्हणून प्रश्न सुटतं नाही. कारणं नसताना वेळ काढूपणा करणे, हे माझे कामं नाही, आता वेळ नाही नंतर या असे टोलवा-टोलवीचे उत्तरं हे कंपनीसाठी नकारात्मक प्रतिमा (negative image) तयार करते. जितके कर्मचारी मदतीसाठी तत्पर, अडचणींना, समस्येला समाधान शोधण्यासाठी तयार, तितकी तुमच्या कंपनीला ग्राहकांची पसंती जास्त. समस्या आहे मान्य पण त्यावर समाधान शोधता येतं ना? कर्मचाऱ्यांच्या कामातील तत्परता ही नेहमीचं कंपनीसाठी महत्वाची असते.
कामाच्या ठिकाणी कशाला तर घरी, समाजात वावरताना आपल्याला बऱ्याच गोष्टीत पुढाकार घ्यावा लागतो. पुढाकार घेण्याची आपली चांगली सवय आपल्यला इतरांपेक्षा वेगळे ठरवू शकते.

प्रभावशाली व्यक्ति - baimanus


आपले सहयोगी, बॉस आपल्याला विश्वासार्ह (trustworthy) आणि वचनबद्ध (committed) मानतील ज्याने आपला फायदाच होणार असतो. बोलण्यापेक्षा कृती महत्वाची असते, जेव्हा तुम्ही परिस्थिती सांभाळता तेव्हा तुमची पुढाकार घेण्याची वृत्ती दिसून येते. बढती, जादा जबाबदाऱ्या हे सर्व आपल्या पुढाकार घेण्यामुळे मिळतं. गोष्टी घडवून आणण्यासाठी आपणं त्यासाठी तसे planning आणि अंमलबजावणी करणे जरुरी आहे. योग्य निर्णय घेण्याची देखील तयारी असावी. आव्हाने हाताळणे/समस्या सोडवणे हे आपले कामं आहे, जबाबदारी आहे हे मनात ठेऊन कामं केले तर त्याचा सर्वांना फायदा होतो. कोणीतरी अनुपस्थित आहे, उपलब्ध नाही तर आपणं कसे त्या वक्तीसाठी उभे राहून कामं पूर्ण करू शकतो हे बघणं महत्वाचे. पुढाकार घ्या, स्वतःची ओळख बनवा त्यामुळे तुमचे मूल्य नक्कीचं वाढेल. सुरवात करा पुढाकार घेण्यासाठी, बघा काय सकारात्मक बदल होतायंत.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here