सातत्यपूर्ण प्रयत्न म्हणजे काय?

यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हे खूप महत्वाचे आहेत. आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी, स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जी मेहनत, संयम लागतो त्यावर न थकता, न हारता जी कामं करायची असतात अशा सर्व गोष्टींसाठी काही महत्वपूर्ण टिप्स.

  • मेघना धर्मेश

सौरभची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो दर सहा महिन्यात नवीन काही चालू करायचा. मग त्याच्या कंटाळा आला की आहे ते अर्थवट सोडून परत काहीतरी दुसरं. ह्या त्याच्या सवयीमुळे, धरपकड वृत्ती मुळे व्हायचं काय? थोडं कुठे आता नीट बस्तान बसतंय असं वाटतं असता परत ते सोडून नव्याने काही तरी सुरु करायचा. अगदी यशाच्या जवळ पोहचून मग ते अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे कसे यश मिळणार? जर तुम्ही सातत्यानं काम करत नसाल, तर तुम्हाला यश मिळण्यासाठी खूप वेळ लागेल. हे नक्की!

जर आपण एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवले तर नक्कीचं आपण आपले ध्येय गाठू शकतो, पण जर सतत हे कर, ते कर, हे तर मला जमणार नाही, जाऊ दे सोडून देऊया असे करणारे बऱ्याचदा कुठलीच गोष्ट नीट करतं नाही. त्यामुळे कारण नसताना वेळ वाया जातो. आपले ध्येय, उद्दिष्टे ह्याच्या अगदी जवळ येऊन देखील सातत्याच्या अभावामुळे आपणं जे शक्य असतं ते करू शकत नाही. कार्यक्षमता वाढवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आपल्या कामात सातत्य राखणे महत्वाचे आहे. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही Give up न करता ज्या गोष्टी करतात त्याचे परिणाम हे नेहमी चांगलेच असतात, वेळेच्या आत तुम्ही कामं पूर्ण करू शकतात. ह्यामुळे आपला कामाच्या प्रति असणारा प्रामाणिकपणा, बांधिलकी ह्याची इतरांना जाणीव होते. त्यामुळे आपल्याला अजून आव्हानात्मक असाइनमेंट, अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. त्याचा करिअर वाढीसाठी, व्यावसायिक प्रगतीसाठी चांगला उपयोग होतो.

सातत्यासाठी आपल्या मदतीला येतो तो म्हणजे संयम. संयम ठेऊन आपण योग्य दिशेने लक्ष्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तर निश्चितचं आपण त्याचे जबरदस्त परिणाम पाहू शकतो. सातत्य हे आपल्यासाठी आपली ताकद ठरू शकतं. एखादी गोष्ट चालू करणं आणि मध्येच सोडून देणे खूप सोप्पं आहे. आपल्या क्षमतेची खरी कसं तेव्हा लागते जेव्हा आपल्या कामासाठी आपण सातत्याने मेहनत घेतो. हे एक कौशल्य आहे. ह्या गुणामुळे आपल्याला नातेसंबध, दररोजची कामे, आपली वृत्ती ह्या साऱ्यांचा समतोल राखण्यास आणि सकारात्मकतेने सामोरे जायला मदत होते. चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी देखील मदत होते.

उदारणार्थ : वाचनाची सवय लावण्यासाठी मी रोज पुस्तकाची पाच पाने वाचणार हे ठरवल्यावर,आपण दररोज आळस न करता ते करणे जरुरी आहे. 2-3 दिवस व्यवस्थित करून मग, बघू, उद्या वाचूया असे केले तर काही उपयोग होणार नाही. आपल्या कामात जेव्हा व्यवस्थितपणा असतो, कामे आपणं नेटाने करतो तेव्हा नक्कीचं लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. सातत्याने गोष्टी केल्या, शिकल्या, समजून घेतल्या तर आपल्या क्षमता समजून घ्यायला मदत होते. आपले प्लस पॉईंट्स आपल्याला उमजतात. एकदा का हि शक्ती सापडली तर मिळालेल्या’ संधीचा पुढे जाण्यासाठी उपयोग होईल. उदास, निराश न वाटता आपणं हे करू शकू ही प्रेरणा मनातून जाणवेल.

तर आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी, स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जी मेहनत, संयम लागतो त्यावर न थकता, न हारता कामं करणं. यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हे खूप महत्वाचे आहे, म्हणून कधीही हार मानू नका (Never Give Up). आपणं दररोज सातत्याने जे प्रयत्न करतो त्याचा परिणाम म्हणजे परिवर्तन घडणे, सकारत्मक बदल होणे. ह्या साऱ्याची आपल्याला स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यास योग्य मदत होते. सवयीने, सरावाने आणि संयमाने आपण ते करू शकू ह्यात शंका नाही. गरज आहे त्याचे महत्व समजून त्यावर कामं करण्याची! या प्रवासात खूप अडथळे येतील, पण तुम्ही तितकेच मजबूत उभे राहिले पाहिजे. जीवनात यश मिळवण्यासाठी प्रयत्न कामात येतात हे लक्षात ठेवा!

मो. 9321314782 |

ई- मेल meghana_25@hotmail.com

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here