अग्निवीर भरती 2022 : महिलांसाठी नोंदणी सुरु होणार

अग्निवीर योजनेअंतर्गत महिलांसाठी १ नोव्हेंबर पासून नोंदणी सुरु

टीम बाईमाणूस

अग्निवीर भरती 2022 साठी महिलांना अर्ज करायचा असेल तर इच्छुक महिलांनी 10 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. लष्करी पोलिसांसाठी सामान्य कर्तव्य श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी अग्निवीर भरती मेळावा 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान सुरू होईल अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली आहे.

संरक्षण मंत्रालयाने रक्षाबंधनापूर्वी कर्नाटकातील अग्निपथ योजनेत नावनोंदणी करणार्‍या महिला उमेदवारांसाठी ही माहिती जाहीर केली आहे. संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आणि माहे येथील महिला उमेदवारांसाठी मुख्यालय रिक्रूटिंग झोन बेंगळुरूच्या अंतर्गत रिक्रूटिंग ऑफिस (HQ) बेंगळुरू द्वारे येथील माणेकशॉ परेड मैदान येथे ही भरती होणार आहे.

अग्निवीर महिला भरती 2022चा तपशील

7 ऑगस्ट रोजी हेडक्वार्टर रिक्रूटिंग झोन, बंगळुरूने एक अधिसूचना प्रकाशित केली ज्यात वय, शैक्षणिक पात्रता आणि सैन्यात निर्दिष्ट श्रेणीमध्ये नावनोंदणीसाठी इतर निकषांचा तपशील नमूद केला आहे. आर्मी महिला अग्निवीर भरती 2022 साठी वयाचा निकष 17.5-23 वर्षे आहे. www.Joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. प्रवेशपत्रे 12 ते 13 ऑक्टोबर 2022 दरम्यान नोंदणीकृत ईमेलवर पाठवली जातील.

भारत सरकारने 14 जून रोजी अग्निपथ भरती योजना सुरू केली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या योजनेअंतर्गत फक्त सैनिक, खलाशी आणि वायुसैनिकांचीच भरती करू शकतात. या योजनेत अग्निवीर उमेदवारांना संबंधित सेवेत चार वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे. चार वर्षे पूर्ण झाल्यावर, 25% सैनिकांना संबंधित सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये अतिरिक्त 15 वर्षांसाठी संधी दिली जाईल. अग्निवीर उमेदवारांना पहिल्या वर्षी ₹30,000 चे वेतन पॅकेज मिळेल. त्यानंतर त्यामध्ये दरवर्षी 10% वाढ होते. तिन्ही दलांचे पात्रता निकष मात्र समान आहेत.

1 जुलै रोजी भारतीय नौदलाने अग्निपथ भरती योजनेसाठी नोंदणी सुरू केली होती. भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांच्या मते, अग्निपथ भरती योजनेसाठी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत 20% उमेदवार महिला असतील. याशिवाय, पोर्टल उघडल्यानंतर काही दिवसांतच सुमारे 10,000 महिलांनी या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्याची नोंद आहे. याआधी, सशस्त्र दलात केवळ अधिकारी पदावर महिलांची नोंदणी केली जात होती. लष्कराने 2019-20 मध्ये प्रथमच महिलांना इतर पदांसाठी भरती करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत, 100 हून अधिक महिला जवान सध्या मिलिटरी पोलिसांमध्ये नोकरी करीत आहेत.

अग्निपथ योजनेत सामील होऊन उमेदवारांना ‘सेवा निधी’ सहयोगी पॅकेज मिळते, ज्या अंतर्गत सैनिक त्यांच्या मासिक मानधनाच्या ३०% योगदान देतील आणि तेवढीच रक्कम सरकार देईल. चार वर्षांनंतर त्यांना 11.7 लाख रुपये एकरकमी मिळतील.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here